चिचखेड़ा फाट्यावर अपघात 2 ठार
By Admin | Updated: February 14, 2017 18:00 IST2017-02-14T18:00:18+5:302017-02-14T18:00:18+5:30
सिल्लोड तालुक्यातील चिचखेड़ा फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या अदन्यात आयशरने मोटर सायकल स्वारास जोराची धड़क दिल्याने दोन जण

चिचखेड़ा फाट्यावर अपघात 2 ठार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि, 14 - सिल्लोड तालुक्यातील चिचखेड़ा फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या अदन्यात आयशरने मोटर सायकल स्वारास जोराची धड़क दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री १ वाजेच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की तालुक्यातील चिचखेडा येथील राहिवासी विट्ठल राऊबा रोठे ( ३० वर्षे) आणि समाधान रोठे (३१ वर्षे) हे दोघे सख्खे चुलत भाऊ रात्री आपल्या दुचाकी क्र. एम.एच २०.जी.आर ८९२० के- हाला येथून चिचखेड़ा येथे जात असतांना समोरून येणाऱ्या आयशरने दुचाकीस समोरासमोर जोरदार धड़क दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला. अपघात होताच आयशरचा चालक वाहनासह फरार झाला या प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या आयशर चालकाचा शोध पोलीस घेत आहे.