लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी चतुर्भुज

By Admin | Updated: March 31, 2016 00:30 IST2016-03-31T00:18:29+5:302016-03-31T00:30:50+5:30

लातूर : औसा पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जावर साधी कारवाई करून जेलमध्ये न टाकण्यासाठी एका पोलिस कॉन्स्टेबलला ४ हजार रुपयांची लाच

Accepting the bribe, the police staff quadrangle | लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी चतुर्भुज

लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी चतुर्भुज


लातूर : औसा पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जावर साधी कारवाई करून जेलमध्ये न टाकण्यासाठी एका पोलिस कॉन्स्टेबलला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. या प्रकरणी औसा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
औसा पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब धोंडिराम सोट यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एका तक्रारअर्जावर साधी कारवाई करण्यासाठी व जेलमध्ये न टाकण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला असता पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब सोट हे लाच स्वीकारताना जाळ्यात अडकले. पंचांसमक्ष त्यांनी स्वत: लाच स्वीकारली असून, याबाबत औसा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे.

Web Title: Accepting the bribe, the police staff quadrangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.