स्वीकृत सदस्य निवड बैठक बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:29 IST2017-08-24T00:29:59+5:302017-08-24T00:29:59+5:30
येथील नगरपंचायतीत बुधवारी स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेस सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने तहकूब झाली. दोन सदस्य निवडीसाठी दोघांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते; परंतु एकाचा अर्ज पीठासीन अधिकाºयांनी अवैध ठरविल्यानंतर हा प्रकार घडला.

स्वीकृत सदस्य निवड बैठक बारगळली
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील नगरपंचायतीत बुधवारी स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेस सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने तहकूब झाली. दोन सदस्य निवडीसाठी दोघांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते; परंतु एकाचा अर्ज पीठासीन अधिकाºयांनी अवैध ठरविल्यानंतर हा प्रकार घडला.
सेनगाव नगरपंचायतच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी बुधवारी अध्याशी अधिकारी प्रंशात खेडेकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा होती. १७ सदस्यीय सभागृहात दोन स्वीकृत सदस्य निवडायचे होते. त्यासाठी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादीच्या वतीने गटनेते उमेश देशमुख यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख तर काँग्रेस-मनसे यांच्या गटाकडून गटनेते विलास खाडे यांनी निखिल देशमुख यांच्या नावाचे नामनिर्देशनपत्र गट प्रमुखांकडे सादर केले होते. छाननीदरम्यान शिवसेनेचे संदेश देशमुख हे सेवा-संस्थेचे पदाधिकारी नसून केवळ सदस्य असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविला. दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी केवळ दोन नावे पुढे आल्याने निवड बिनविरोध होणार असे अपेक्षित होते; पंरतु एक अर्ज अवैध झाल्याने निवड प्रकिया न करता सर्व सदस्यांनी बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. कोरमअभावी बैठक रद्द झाली. यावेळी खेडेकर यांच्यासह उमाकांत पारधी, तहसीलदार वैशाली पाटील, ज्योती भगत आदी उपस्थित होते. आज दुसºयांदा स्वीकृत सदस्य निवड बाळगली असून प्रत्येक निवडीच्या वेळी वेगवेगळी सोयीची राजकीय परिस्थिती पहावयास मिळाली. त्यामुळे आगामी काळात पुन्हा यासाठी कोणती समीकरणे जुळतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.