शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून ‘सीएनडी’ प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:53 IST

'स्वच्छ भारत'मध्ये झेप घेतल्याने महापालिकेचा उत्साह वाढला 

ठळक मुद्देरमानगर येथील जागा निश्चितलवकरच निविदा काढणार

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधील सर्वेक्षणात औरंगाबाद शहराने ४७ वरून २६ व्या स्थानावर झेप घेतल्याने महापालिकेचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शहरात दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहेत, तर तिसरा हर्सूल येथील प्रकल्प प्रगतिपथावर आहे. आता शहरातील बांधकाम साहित्यापासून सिमेंटच्या विटा तयार करणारा प्रकल्प रमानगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार असून, याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

इंदूर महापालिकेने चार वर्षांपूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू केले आहेत. उद्यानात जमा होणाऱ्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती, शहरातील बांधकाम साहित्यापासून विटा तयार करणे असे अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारले आहेत. औरंगाबाद महापालिकेने कचरा कोंडीनंतर इंदूर महापालिकेप्रमाणे डीपीआर तयार केला. या कामासाठी इंदूर येथील प्रकल्प सल्लागार समिती नेमली. या समितीने तयार केलेल्या डीपीआरला महाराष्ट्र शासनाने १४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून आतापर्यंत महापालिकेने चिकलठाणा येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू केला. त्यापाठोपाठ पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा दुसरा प्रकल्प सुरू झाला आहे. हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा तिसरा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे बायोगॅस प्रकल्पही पूर्ण झाला आहे. मात्र तो  सुरू केलेला नाही. आता लवकरच बांधकाम साहित्यासाठी स्वतंत्र प्रकल्प रमानगर येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

पीपीपी मॉडेलवर प्रकल्पहा सीएनडी प्रकल्प ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ या तत्त्वावर राहणार असून, ज्या कंत्राटदाराला या प्रकल्पात रस आहे त्याला ५० टक्के रक्कम गुंतवावी लागेल. प्रकल्प उभारणीसाठी ५० टक्के वाटा महापालिकेचा राहणार आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका