घाटनांद्रा परिसरात मिरची तोडणीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST2021-07-09T04:04:36+5:302021-07-09T04:04:36+5:30

घाटनांद्रा : एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेले पूर्वहंगामी मिरचीचे पीक सध्या चांगलेच बहरात आले आहे. आता प्रत्यक्ष मिरची तोडणीला ...

Accelerate chilli harvesting in Ghatnandra area | घाटनांद्रा परिसरात मिरची तोडणीच्या कामांना वेग

घाटनांद्रा परिसरात मिरची तोडणीच्या कामांना वेग

घाटनांद्रा : एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेले पूर्वहंगामी मिरचीचे पीक सध्या चांगलेच बहरात आले आहे. आता प्रत्यक्ष मिरची तोडणीला सुरुवात झाली असून, शेतमजुरांना रोजगार मिळू लागला आहे, तर मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी चिंतेत पडला असून, त्यावर फवारणी करीत मिरचीची तोडणी शेतकरी करू लागला आहे.

कमी दिवसांत जास्त उत्पन्न देणारे व शेतकऱ्यांसह मजुरांना नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून मिरचीकडे पाहिले जात आहे. यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याचे नियोजन करून सुमारे ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली. ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरवर मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. जून महिन्याच्या शेवटी मिरची पिकांवर कोकडा, मावा आदींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत पडला. फवारणी करीत त्याने मिरची तोडणीला सुरुवात केली आहे.

----

५ ते ७ रुपये प्रतिकिलो तोडणी

मजुरांच्या टंचाईमुळे मिरची तोडणीच्या दरातही वाढ होत आहे. कधी पाच तर सात रुपये किलो, असा मिरची तोडणीचा दर आहे. एक तर मजूर दिवसभरात साधारण सत्तर ते ऐंशी किलो मिरची तोडणी करतो. यातून चारशे ते पाचशे रुपये रोजंदारी मिळते. शाळकरी मुले देखील मिरची तोडणीचे काम करीत आहे. मिरचीला सध्या बाजारात तीन हजार सातशे रुपये तर चार हजारांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

080721\img-20210704-wa0037.jpg

घाटनांद्रा परिसरात मिरची तोडणीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे.

Web Title: Accelerate chilli harvesting in Ghatnandra area