विमानतळ इमारत, धावपट्टी विस्तारीकरणाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:05 IST2021-04-10T04:05:06+5:302021-04-10T04:05:06+5:30

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या डाॅ. कांबळे यांच्याशी केलेल्या चर्चेत लाॅकडाऊनचा काळ पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तम काळ आहे. ...

Accelerate airport building, runway expansion | विमानतळ इमारत, धावपट्टी विस्तारीकरणाला गती द्या

विमानतळ इमारत, धावपट्टी विस्तारीकरणाला गती द्या

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या डाॅ. कांबळे यांच्याशी केलेल्या चर्चेत लाॅकडाऊनचा काळ पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तम काळ आहे. जेणेकरुन जनजीवन सुरळीत होईल. तेव्हा त्यांच्या सोयीसाठी सुविधा प्रकल्प पूर्ण होतील. त्यामुळे शासनाने विमानतळ इमारत विस्तारीकरण आणि धावपट्टी विस्तारीकरणाला गती देण्याची मागणी केली आहे. ही कामे लाॅकडाऊन काळात पूर्ण केल्यास लांब धावपट्टीमुळे मोठी प्रवासी,मालवाहू विमाने औरंगाबादेत सुरु होतील. त्यासाठी व्यापारी वेळ वाढवण्याची गरज असल्याचे सांगत यामुळे मराठवाडा, खान्देशातील नाशवंत फळे, फुले विदेशात निर्यात करण्यासाठी फायदा होईल. यात केळी, डाळिंब, चिकू, मोसंबी, संत्री, फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ होईल. याकडे उद्योजक सुनीत कोठारी यांनी डॉ. कांबळे यांचे लक्ष वेधले. तसेच विमानतळ धावपट्टी ९३०० फूट ते १२ हजार फूट विस्तारीकरणाला गती देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली.

Web Title: Accelerate airport building, runway expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.