‘एसीबी’कडून कर्मचाऱ्यांवर कारवाई; अधिकारी नामानिराळे
By Admin | Updated: August 29, 2016 00:59 IST2016-08-29T00:12:44+5:302016-08-29T00:59:54+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड एसीबी कडून झालेल्या कारवार्इंमध्ये कर्मचाऱ्यांवर सापळा रचून पकडले जाते.

‘एसीबी’कडून कर्मचाऱ्यांवर कारवाई; अधिकारी नामानिराळे
व्यंकटेश वैष्णव , बीड
एसीबी कडून झालेल्या कारवार्इंमध्ये कर्मचाऱ्यांवर सापळा रचून पकडले जाते. मात्र, यामध्ये ज्या कार्यालयाचा कर्मचारी लाच घेताना पकडला त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत कारवाई पोहचत नसल्याचे यापूर्वीच्या प्रकरणातून समोर येत आहे.
तीन दिवसापूर्वी बीड येथील उप विभागीय कार्यालयातील कर्मचारी तीस हजार रुपयांची लाच घेताना पकडला. यामध्ये गुरूवारी पुन्हा अजून उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी पकडले. याशिवाय तीन-चार महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला वैद्यकीय देयके काढून देण्यासाठी पैसे घेताना एसीबीने पकडले होते. यादोन्ही घटनेत अधिकारी नामानिराळेच रहात असल्याचा अनुभव येत आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत: नामानिराळे राहत असल्याने याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी लाच प्रकरणात कर्मचारी पकडल्यानंतर त्याचा तपास कर्मचाऱ्यांच्या पुढे जात नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.