शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:00 IST

शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणारा कोतवाल व तलाठी, असे दाेघे एकाच वेळी एसीबीच्या सापळ्यात अडकले. सोमवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (३०, रा. म्हाडा कॉलनी, पैठण) व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (३६, रा. आपेगाव) यांना अटक केली.

तक्रारदाराची पैठण तालुक्यातील अगर नांदूरमध्ये गट क्रमांक ५८ मध्ये ५० आर सामायिक शेतजमीन आहे. त्यापैकी तक्रारदाराच्या नावे १६ आर जमीन आहे. २५ जुलै रोजी त्यांनी जमिनीच्या वाटणीपत्रासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्याच्यावर नंतर काहीच कारवाई झाली नाही. १ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने कोल्हेकडे विचारणा केली. तेव्हा वाटणीपत्र करून देण्यासाठी त्याने बिनीवालेच्या नावाने १० हजारांच्या लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांनी पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना खातरजमा करून कारवाईच्या सूचना केल्या.

गमछा खांद्यावरून काढताच झडपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, धर्मराज बांगर यांनी खातरजमा केली. त्यात कोल्हेने तडजोडीअंती ८ हजारांची मागणी केली. शिवाय, कोल्हेने बिनीवालेला कॉल करून याबाबत विचारणादेखील केली. कोल्हेने पैसे घेतल्यावर खांद्यावरचा गमछा खाली उतरवण्याचा इशारा ठरला होता. ठरल्याप्रमाणे दुपारी ४ वाजता तक्रारदाराने कोल्हेच्या हातात पैसे टेकवले आणि गमछा उतरवला. तेथेच दबा धरून बसलेल्या गुसिंगे, बांगल, अंमलदार राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी.एन. बागुल यांनी धाव घेत त्याला रंगेहाथ ताब्यात घेत बिनीवालेलादेखील अटक केली. दोघांवरही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग