लाच मागणाऱ्या मोजणीदाराचे ‘एसीबी’ने घेतले ‘माप’!

By Admin | Updated: April 1, 2016 01:11 IST2016-04-01T00:38:40+5:302016-04-01T01:11:24+5:30

शिरूर कासार : जमीन मोजणी केल्यानंतर सीमा निश्चित करण्यासाठी एका शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मोजणीदाराविरुद्ध गुरुवारी येथील ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

'AC measurement' taken by ACB for demanding bribe! | लाच मागणाऱ्या मोजणीदाराचे ‘एसीबी’ने घेतले ‘माप’!

लाच मागणाऱ्या मोजणीदाराचे ‘एसीबी’ने घेतले ‘माप’!

शिरूर कासार : जमीन मोजणी केल्यानंतर सीमा निश्चित करण्यासाठी एका शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मोजणीदाराविरुद्ध गुरुवारी येथील ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
आय. एम. सय्यद असे त्या मोजणीदाराचे नाव आहे. तो शिरुर येथील भूमिअभिलेख कार्यालयात वर्ग ३ पदावर कार्यरत आहे. रोळेसांगवी येथील एका शेतकऱ्याची जमीन भूमिअभिलेख कार्यालयाने मोजली होती. सीमारेखा निश्चित करण्यासाठी सय्यद याने शेतकऱ्यास साडेसात हजार रुपये मागितले. शेतकऱ्याने ११ मार्च रोजी ‘एसीबी’कडे तक्रार केली. पडताळणीनंतर सापळाही लावला; परंतु संशय आल्याने सय्यदने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. ‘मी तुमचे काम करतो, पैसे देऊ नका’ असे त्याने शेतकऱ्यास सांगितले. लाचेची मागणी केल्याने सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला. निरीक्षक गजानन वाघ तपास करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'AC measurement' taken by ACB for demanding bribe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.