शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

निनावी पत्रावरून २२ मुलींवर अत्याचार उघडकीस, तपासासाठी पोलिस उपायुक्तांना दक्षता पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:52 IST

संवेदनशील प्रकरणात उत्कृष्ट तपासासाठी पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

छत्रपती संभाजीनगर : एका निनावी पत्रावरून नामांकित शिक्षण संस्थेतील २२ मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणत संवेदनशीलपणे तपास करून आरोपीला तब्बल चार वेळेस जन्मठेपेची शिक्षा लागेपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना यंदाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. लोकमत समूहानेदेखील २०२३ मध्ये त्यांना पॉवरफुल वूमन पुरस्काराने सन्मानित केले होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात पोलिस विभाग, सुरक्षा यंत्रणेत दक्ष, प्रामाणिक, तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदार व जवानांना शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर केले. यंदा राज्यातील पाच अधिकाऱ्यांना हे पदक प्राप्त झाले. शहर पोलिस उपायुक्त म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या वालावलकर यांचा यात समावेश आहे. एम.एस्सी. (फिजिक्स) व कायद्याच्या पदवीधर असलेल्या वालावलकर २००६ मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. २०१० मध्ये पोलिस दलात दाखल झाल्या.

चार जिल्ह्यांत उल्लेखनीय कामगिरीकालावधी - सेवा२०१० ते २०१२ - जिल्हा पोलिस दलात प्रशिक्षणार्थी, तसेच उपअधीक्षक२०१२ ते २०१४ - उपअधीक्षक, तुळजापूर२०१४ ते २०१८ - सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, सोलापूर शहर२०१९ ते २०२१ - अपर पोलिस अधीक्षक, नाशिक जिल्हा२०२१ ते २०२२ - उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग२०२२ ते २०२५ - अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक विभाग

१ कोटींच्या लाचेचा यशस्वी सापळावालावकर नाशिक एसीबी अधीक्षकपदी असताना २०२२ ते २०२५ या कालावधीत तब्बल ३९५ लाचेच्या कारवायांत १०० पेक्षा अधिक वर्ग १ च्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच घेताना पकडले होते.

२२ मुलींना दिला न्यायसांगलीच्या उपअधीक्षकपदी कार्यरत असताना एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र प्राप्त झाले होते. वालावलकर यांच्यासह उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी तपास करत संस्थेचा अध्यक्ष अरविंद पवारविरोधात २० भक्कम साक्षीदार व ६० पुरावे निष्पन्न केले. त्याने २२ मुलींसोबत गैरप्रकार करून चार मुलींवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. या संवेदनशील तपासामुळे आरोपीला एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप लागली.

English
हिंदी सारांश
Web Title : Anonymous Letter Exposes Abuse, Cop Gets Gallantry Award

Web Summary : DCP Sharmistha Gharge-Walavalkar receives gallantry award for uncovering abuse of 22 girls based on anonymous letter. She ensured the accused received four life sentences. Previously, she caught an official accepting a ₹1 crore bribe.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी