अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:02 IST2021-02-17T04:02:27+5:302021-02-17T04:02:27+5:30
१७ जून २०१६ रोजी फिर्यादीच्या चुलत बहिणीचे लग्न होते. पहाटे ४ वाजता फिर्यादीच्या मामाच्या घरासमोर राहणारा ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला सश्रम कारावास
१७ जून २०१६ रोजी फिर्यादीच्या चुलत बहिणीचे लग्न होते. पहाटे ४ वाजता फिर्यादीच्या मामाच्या घरासमोर राहणारा आरोपी बळजबरी घरात घुसला. फिर्यादीचे तोंड दाबून अत्याचार केला .फिर्यादीच्या मामीने आरोपीला पकडले. मात्र तो पळून गेला. बेशुद्ध पडलेल्या फिर्यादीच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणले.
पोलीस उपनिरीक्षक अरुण डोंगरे आणि कॉन्स्टेबल पंकज पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. सरकारतर्फे लोकअभियोक्ता उल्हास मारोतीराव पवार यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात पीडिता आणि डॉक्टरचा जबाब महत्त्वाचा ठरला. त्यांना (पैरवी) सनी खरात यांनी सहकार्य केले.