शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गर्भवती राहिल्यानंतरही मित्राकडून अत्याचार, गर्भपातानंतर लग्नासाठी केली २ कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:43 IST

मित्राविरोधात तरुणीची तक्रार, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या मित्राने लग्नाचे आमिष दाखवून गोवा, मनाली, इगतपुरी, दिल्ली, मुंबईच्या अलिशान हॉटेलमध्ये नेत अत्याचार केले. मोबाइलमध्ये त्याचे चित्रण करून बांधकाम व्यावसायिक महिलेला ब्लॅकमेल केले. यातून ती गर्भवती असताना अत्याचार करून लग्न करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अभिषेक संजीव गुप्ता (रा. गारखेडा) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० वर्षीय तरुणीची बांधकाम कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी पूर्वाश्रमीच्या प्रियकराने फसवणूक करून अत्याचार केल्याप्रकरणी तिने मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच प्रियकराचा अभिषेक मित्र आहे. प्रियकरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीने साथ साेडल्याने अभिषेकने तरुणीला मदत केली होती. मात्र, त्याकडे तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्र, व्हिडीओ होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याने ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर सातत्याने दिल्ली, मुंबई, मनाली, मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन वारंवार अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचे चित्रिकरण करून तो तरुणीला पाठवून धमकावत होता. भावनिक कारण करून त्याने माझ्याकडून २५ लाख रुपये घेतल्याचा आरोपही तरुणीने तक्रारीत केला आहे.

तरुणाच्या घरात झाला हाेता वादकाही महिन्यांपूर्वी तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला. अभिषेकने टाळाटाळ केली. ऑगस्ट महिन्यात तरुणी चार महिन्यांची गर्भवती असताना अभिषेकने तिच्यावर अत्याचार केले. परिणामी, तरुणीचा गर्भपात झाला. १५ सप्टेंबर रोजी तरुणीने त्याचे गारखेड्यातील घर गाठले. तेथे त्याच्या कुटुंबासोबत वाद झाल्याने तिने पोलिसांना बोलावून घेतले. अभिषेकच्या कुटुंबानेही तरुणीविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गंभीर आरोपांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर तरुणीने मुकुंदवाडी ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिली. उपनिरीक्षक संजय राऊत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी