पार्किंग नसतानाही
By | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:01+5:302020-12-02T04:12:01+5:30
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनधारकांना मिळेल त्या जागेवर वाहन उभे करावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दंडात्मक ...

पार्किंग नसतानाही
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनधारकांना मिळेल त्या जागेवर वाहन उभे करावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कारवाई होत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ प्रवाशांची गैरसाेय
औरंगाबाद: रेल्वेस्टेशनवर सध्या प्रवाशांशिवाय इतर काेणालाही आतमध्ये साेडले जात नाही. त्यामुळे नातेवाईकांना बाहेरूनच रवाना व्हावे लागत आहे. ज्येष्ठ प्रवाशांना सामानासह आतमध्ये जाताना गैरसाेयीला ताेंड द्यावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ प्रवाशांसाेबत एखाद्या नातेवाईकाला आतमध्ये जाऊ देण्याची परवानगी देण्याची मागणी हाेत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातील
थांब्यांची दुरवस्था
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात ४ स्वतंत्र थांबे बांधण्यात आलेले आहे. आजघडीला या थांब्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यांचा वापर हाेत नसल्याने जागाेजागी अस्वच्छता पसरली आहे. याठिकाणी बेवारस लाेक ठाण मांडत आहे. याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष हाेत आहे.
ओपीडीसमाेरील दुकानाचा
मलबा हटविण्याकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागासमाेर बांधण्यात आलेले औषधी दुकान ताेडण्यात आले. परंतु या दुकानाच्या बांधकामाचा मलबा अद्यापही हटविण्यात आलेला नाही. सिमेंटच्या विटा आणि इतर साहित्य याच ठिकाणी पडून आहे.
घाटी परिसरात
पाण्याची सुविधा
औरंगाबाद : घाटी रुग्णालय परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या पाणपाेईची सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे गाेरगरीब रुग्ण, नातेवाईकांची बाटलीबंद पाणी घेण्यापासून सुटका झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था घाटीत नव्हती.