‘गुरूगौरव’चा मुहूर्र्त टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:30 IST2017-09-03T00:30:00+5:302017-09-03T00:30:00+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मागील तीन व यंदाचे पुरस्कार वितरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते़, परंतु यंदाही ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला आहे़ १५ सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़

‘गुरूगौरव’चा मुहूर्र्त टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मागील तीन व यंदाचे पुरस्कार वितरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते़, परंतु यंदाही ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला आहे़ १५ सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़
शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुरूगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते़, परंतु मागील तीन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले आहेत़ यंदा नव्या पदाधिकाºयांनी हा पुरस्कार सोहळा थाटात करण्याचा संकल्प केला होता़ त्यासाठी शिक्षण विभागानेही तयारी केली होती, परंतु ५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने शिक्षक दिनाचा मुहूर्त टळला़ त्यामुळे आता पुढील दहा दिवसांत हा सोहळा घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे़
नांदेड शहरात ६ किंवा ७ तारखेनंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्यामुळे हा पुरस्कार सोहळा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे़ माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे समजते़
२०१४ ते २०१६ या वर्षातील रखडलेले पुरस्कार व २०१७ मधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा एकाच सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे़ यावर्षीसाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या निवडीचे काम संपले असून लवकरच जि़ प़ अध्यक्ष, शिक्षण सभापती यांच्या उपस्थितीत नावे जाहीर होणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी सांगितले़