ध्वजारोहणास गैरहजेरी...
By Admin | Updated: May 3, 2016 01:08 IST2016-05-03T00:44:41+5:302016-05-03T01:08:10+5:30
पैठण : महाराष्ट्र राज्याच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी तहसील कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास तीन नायब तहसीलदारांसह आठ कर्मचारी गैरहजर होते

ध्वजारोहणास गैरहजेरी...
पैठण : महाराष्ट्र राज्याच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी तहसील कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास तीन नायब तहसीलदारांसह आठ कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असा प्रस्ताव तहसीलदार किशोर देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ५६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम १ मे रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमास तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच गैरहजर असल्याचे यावेळी जाणवले. याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. आ. भुमरे यांनी तहसीलदार किशोर देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता हे अधिकारी कर्मचारी विनापरवानगी गैरहजर असल्याचे त्यांनी
सांगितले.
प्रस्ताव सादर
गैरहजर असलेल्या या आठ कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासन राजशिष्टाचार परिपत्रक एप्रिल २०१६ ची अवहेलना करून राष्ट्रीय कार्यक्रमाचा अनादर केल्याचे स्पष्ट झाले.
या परिपत्रकानुसार दांडीबहाद्दर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.
अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेल्या महिला सरपंचाला ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यात आली.
४या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. युवराज वराडे, संपत वराडे, कृष्णा गिरी, शरद समिंद्रे, राजू, सोमिनाथ वराडे,भगवान दळवी, सोजी काळे (रा. सारोळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
१ मे रोजी ध्वजारोहण समारंभप्रसंगी आरोपींनी तक्रारदार महिला सरपंच यांना ग्रामसभा का घेतली नाही म्हणत शिवीगाळ केल्याचे, तसेच यातील दोघांनी अश्लील हातवारे केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
४पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि मनोहर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ताहेर शहा,सांडू जाधव करीत आहे.