मुखेडमध्ये बालगृहातून बालकास पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:43 IST2017-10-25T00:43:25+5:302017-10-25T00:43:29+5:30
मुखेड येथील एका बालगृहातून बालकास पळविल्याची घटना २२ आॅक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुखेडमध्ये बालगृहातून बालकास पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मुखेड येथील एका बालगृहातून बालकास पळविल्याची घटना २२ आॅक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुखेड येथे असलेल्या कै. वसंतराव नाईक बालगृहात पंकज भगवानराव नांदेडकर (वय १५) हा मुलगा राहत होता. २२ आॅक्टोबरच्या रात्री पंकजला पळवून नेल्याची बाब उघड झाली. याप्रकरणी बालगृहाचे अधीक्षक मोहन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.
शेंबोलीत घरफोडी
मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथे घरफोडी करुन चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २३ आॅक्टोबरच्या मध्यरात्री घडली. शेंबोली येथील भीमराव गजानन कल्याणकर यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. रोख रक्कम व दागिने लंपास केले. बारड ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.