अंगणवाडी भरतीला आचारसंहितेचा ब्रेक
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:29:15+5:302014-09-29T00:41:38+5:30
लातूर : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गच्या अंगणवाडीच्या ९ सेविका व ३७ मदतनीस अशा ४६ पदांच्या भरतीस ब्रेक लागला आहे़

अंगणवाडी भरतीला आचारसंहितेचा ब्रेक
लातूर : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गच्या अंगणवाडीच्या ९ सेविका व ३७ मदतनीस अशा ४६ पदांच्या भरतीस ब्रेक लागला आहे़ निवडणुकीनंतर या भरती प्रक्रियेस वेग येणार आहे़
बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग-१ अंतर्गत जिल्ह्यात १७५ अंगणवाड्या मंजूर झाल्या असून त्यापैकी १६७ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ यापैकी लातूर शहरात १३० अंगणवाड्या आहेत़ उदगीर शहरात २९ अंगणवाड्या आहेत़ अहमदपूर व औसा शहरात प्रत्येकी ४ अंगणवाड्या आहेत़ निलंगा शहरासाठी ४ अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत़ पण त्या मनुष्यबळाअभावी अद्यापही चालू नाही़ या अंगणवाड्या सुरु करण्यासाठी पदभरती करण्यास प्रारंभ करण्यात आला होता़त्या अंतर्गत सेविका, मदतनीस अशा ४६ पदांच्या रिक्त पदावरील भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले होते़
लातूर शहरातील अंगणवाड्यासाठी १४ मदतनिसाची पदे रिक्त होती. उदगीरच्या ८ मदतनिसाची पदे रिक्त होती़ अहमदपूर अंगणवडीसाठी २ सेविका व ६ मदतनीस तर औश्यासाठी ३ सेविका, ५ मदतनीस पदे़ निलंग्यासाठी सेविका-४, मदतनीस-४ रिक्त पदाची एकूण ४६ रिक्तपदांची भरतीसाठी बाल विकास विभागाकडे एकूण ८३४ अर्ज प्राप्त झाल़े यात सर्वाधिक अर्ज ४७६ लातूरसाठी प्राप्त झाले होते़ या अर्जातील ६५ अर्ज पात्र झाले तर ४११ अर्ज अपात्र ठरले़ उदगीरसाठी १५८ अर्ज प्राप्त झाले़ २८ अर्ज पात्र, १३० अर्ज अपात्र ठरले आहेत़ अहमदपूरसाठी ९१ अर्ज प्राप्त झाले़ ३४ अर्ज पात्र, ५७ अर्ज अपात्र ठरले आहेत़ औसाच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसपदासाठी ४२ अर्ज प्राप्त झाले यामध्ये १९ अर्ज पात्र तर २३ अपात्र ठरले आहेत़
निलंग्यासाठी ६७ अर्ज प्राप्त झाले, यात २४ अर्ज पात्र तर ४३ अपात्र ठरले आहेत़ एकूण अर्जापैकी १७० अर्ज पात्र तर ६६४ अर्ज अपात्र ठरले आहेत़ ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी भरती प्रक्रिया ही निवडणूकीनंतरच होणार आहे़ त्यामुळे पात्र उमेदवामध्ये नाराजी पसरली आहे़ विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतरच या रिक्त पदांची भरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
लातूर शहरातील अंगणवाड्यांमध्ये १४ मदतनीसांची पदे रिक्त आहेत़ ही पदे भरण्यासाठी अर्जही मागविण्यात आले होते़ परंतु, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या भरती प्रक्रियेस स्थगिती मिळाली असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी गिरी यांनी सांगितले़