अबब ! ओढ्यातच अनधिकृत टोलेजंग इमारती !

By Admin | Updated: February 22, 2015 00:38 IST2015-02-22T00:24:20+5:302015-02-22T00:38:11+5:30

बीड पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांंच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकामे सुरू असून अनेकांनी शुक्रवारपेठ,

Above! Unauthorized high rise buildings! | अबब ! ओढ्यातच अनधिकृत टोलेजंग इमारती !

अबब ! ओढ्यातच अनधिकृत टोलेजंग इमारती !

 बीड
पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांंच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकामे सुरू असून अनेकांनी शुक्रवारपेठ, विप्रनगर भागातील ओढ्यातच अनधिकृतपणे टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पाहणी करून अनधिकृत इमारती पाडाव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, पालिकेने त्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली आहे.
शहरात सध्या गल्लीबोळात अनधिकृत बांधकामे करून जागा बळकावण्यात येत आहेत. अशा प्रकरणांच्या तक्रारी वाढल्या असताना यावर तोडगा काढण्यास पालीका उदासीन आहे. उलट आलेल्या तक्रारदारांनाच उडवाउडवीची उत्तरे देऊन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम पालिकेतील नगररचना विभागातील कर्मचारी करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.
शहरातील शुक्रवार पेठ, विप्रनगर भागातून एक ओढा जातो; मात्र आता या ओढ्याचा नाला झाल्याचे दिसून येत आहे. या ओढ्यातच अनेकांनी मोठ मोठ्या इमारती बांधल्या असून सध्याही अनेक कामे सुरू आहेत. हा ओढा नाळवंडी नाका भागापासून सुरू होतो आणि बिंदुसरेत विसर्जीत होतो. दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या इमारतींमुळे आसपासच्या घरांना पुराचा धोका संभवतो. मोठा पाऊस झाल्यावर ओढ्यातील पाणी विप्रनगर, शुक्रवार पेठ मध्ये जाऊन मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आठ दिवसांत अहवाल सादर करा
या अतिक्रमणांबाबत १८ आॅगस्ट २००७ ला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्याचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे आदेश दिले होते, मात्र या आदेशाला संबंधीत विभागाने केराची टोपली दाखविली. ना अहवाल सादर केला ना कारवाई.

Web Title: Above! Unauthorized high rise buildings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.