शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अबब...औरंगाबादमध्ये कम्पोस्टिंग पीट उभारणीस होणार ५ कोटींचा खर्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:42 IST

महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

ठळक मुद्देपाण्यासारखा पैसा खर्च करून फक्त ७० ते ८० टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात येईल.शहरात दररोज किमान ३०० मेट्रिक टन कचरा जमा होतो.

औरंगाबाद : महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून फक्त ७० ते ८० टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात येईल. शहरात दररोज किमान ३०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. उर्वरित ओल्या कचऱ्याचे करणार काय? याचे उत्तर मनपाकडे नाही.

शहरातील कचरा प्रश्न महापालिकेच्या दृष्टीने पूर्णपणे संपला आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर कचऱ्यावर केमिकल पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली. आकाशवाणी येथेही कचरा उचलण्यात आला. पदमपुरा येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. मध्यवर्ती जकात नाका येथे फक्त ३० टक्के कचरा आहे. औरंगपुऱ्यातील कचऱ्याचे डोंगरही आठ दिवसांत नष्ट करण्यात येणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज कचरा जास्त नसल्याचा दावा मनपाचा आहे. 

शहरातील कचरा कोंडी फोडण्यासाठी झोननिहाय कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठ्या पीटवर पत्र्याचे शेडही उभारण्यात येत आहे. कायमस्वरूपी हे पीट राहणार आहेत. ४३३ कम्पोस्टिंग पीटसाठी ४ कोटी ८७ लाख ५९ हजार ९१५ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एवढा अवाढव्य खर्च मनपा करीत असून, सर्व पीटवर ७० ते ८० टन ओल्या कचऱ्यावरच प्रक्रिया होणार आहे. शहरात ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यात ३०० मेट्रिक टन ओला कचरा असतो. २०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचे काय करणार याचे उत्तर मनपा प्रशासनाकडे सध्या तरी नाही. 

मशीन खरेदी ३ कोटीतएकीकडे कम्पोस्टिंगसाठी मनपा ५ कोटी रुपये खर्च करीत आहे. झोननिहाय मशीन खरेदीसाठी ३ कोटी १६ लाख ८० हजार रुपयांची निविदा प्रसिद्व करण्यात आली आहे. मनपाच्या नऊ झोनमध्ये या मशीन बसविण्यात येतील. सर्व मशीनवर किमान ३० ते ४० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होईल, असा दावा मनपाचा आहे. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

कम्पोस्टिंग पीटचा झोननिहाय खर्चझोन    प्रस्तावित पीट    खर्चझोन १         ५८    ४२ लाख ४७ हजारझोन २         १५    १९ लाख ०६ हजारझोन ३         ७९    ९० लाख ६२ हजारझोन ४         ४१    ४३ लाख ७८ हजारझोन ५         ०१    ३९ लाख ११ हजारझोन ६         ४५    ९८ लाख ५५ हजारझोन ७         ९८    ५३ लाख ५१ हजारझोन ८         १८    ४९ लाख ४१ हजारझोन ९         ७८    ५१ लाख ०३ हजार 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादMONEYपैसा