लघुसिंचनचे ८ कोटी अजूनही शिल्लकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:11 IST2017-08-06T00:11:27+5:302017-08-06T00:11:27+5:30
जि.प.च्या लघुसिंचन विभागावर एक तर पदाधिकाºयांची मेहेरनजर आहे किंवा हा विभागच ठप्प झाल्याची चिन्हे आहेत. तब्बल ८ कोटी रुपये मार्च एण्डपासून शिल्लक असून त्यावर कधी चुकूनही चर्चा होताना दिसत नाही.

लघुसिंचनचे ८ कोटी अजूनही शिल्लकच
हिंगोली : जि.प.च्या लघुसिंचन विभागावर एक तर पदाधिकाºयांची मेहेरनजर आहे किंवा हा विभागच ठप्प झाल्याची चिन्हे आहेत. तब्बल ८ कोटी रुपये मार्च एण्डपासून शिल्लक असून त्यावर कधी चुकूनही चर्चा होताना दिसत नाही.
जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग त्यांच्या संथ कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या विभागाकडून होणाºया कामांचे अहवालही बदलले जात नाहीत. प्रत्येक बैठकीत तेच अहवाल ठेवले तरीही सदस्यही निमूटपणे सहन करतात. नवीन असल्याने तर अनेकांना त्याचा अभ्यासच नाही. मात्र निधी वारंवार सांगूनही अखर्चित राहात असल्यास कामे बदलता येतात, हे बहुदा या सदस्यांना माहिती नसावे. ती बदललीच तर खर्चाचे प्रमाण मात्र शून्य टक्के राहता कामा नये, याची काळजीही त्यांना घ्यावी लागणार आहे.
या विभागाला लघुपाटबंधारेच्या कामांसाठी २0१५-१६ चा शिल्लक १.३९कोटी तर २0१६-१७ मध्ये २.३१ कोटी मंजूर झाले. एकूण ३.७0 कोटी उपलब्ध असताना कामे १.४९ कोटींची झाली. २.२0 कोटी शिल्लक आहेत. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांसाठीही शिल्लक १.२३ कोटी, मंजूर १.४६ कोटी होते. मात्र कामे १.२७ कोटींची झाली. १.४१ कोटी शिल्लकच आहेत. आदिवासी उपयोजनेत लपाचे शिल्लक ४९ लाख नवीन मंजूर ५0 लाख होते. केवळ २६ लाख खर्च झाले. कोल्हापुरी बंधाºयांसाठी ओटीएसपीत शिल्लक ७७ लाख व नव्याने मंजूर ७५ लाख होते. यातही ८0 लाख खर्च अन् ७१ लाख शिल्लक आहेत. सर्वांत मोठा प्रश्न जलयुक्त शिवारचा होता. या योजनेत शिल्लकच ४.९३ कोटी होते. तर नव्याने ३.२0 कोटी मंजूर झाले होते. यापैकी ३.७८ कोटी रुपयेच खर्च झाले. ३.२0 कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे या विभागाच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.