शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा.मा.म. संमेलनतर्फे भजन स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : ‘चंद्रभागेच्या काठावरती लागलाय मृदंग वाजायला...’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ यासारख्या भजनांनी कलश मंगल कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला

औरंगाबाद : ‘चंद्रभागेच्या काठावरती लागलाय मृदंग वाजायला...’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ यासारख्या भजनांनी कलश मंगल कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला, निमित्त होते अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनातर्फे आषाढी एकादशीनिमित्त घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेचे.या स्पर्धेत शहरातील विविध भागांतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सोलो भजन गायन, ग्रुप भजन गायन, असे दोन भाग करण्यात आले होते. या दोन्ही मिळून एकूण ६० जणांचा सहभाग होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी नावंदर, आशा शहरवाला यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दीप प्रज्वलनानंतर सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून नियम सांगण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना अवश्यक आसलेले वादन साहित्य आपण आपले आणायला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व स्पर्धकांनी आपापले साहित्य सोबत आणून उत्कृष्ट सादरीक रण केले.कोणी वेशभूषेत तर कोणी शब्दोच्चाराने श्रोत्यांना आकर्षित करीत होते. काही ग्रुपने तर भजनासाठी आवश्यक असणाऱ्या वेशभूषेत येऊन श्रोत्यांना मोहित केले. यात ‘या या पाडुरंगाचे पाय पाहू चला...’ या भक्ती भजनी मंडळाच्या भजनाने स्पर्धेस सुरुवात झाली. त्यानंतर उमा वर्मा यांनी सोलोमध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या भक्तिगीतासह आपल्या सुंदर आवाजाने श्रोत्यांना आपल्याकडे आकर्षित केले. ‘चंद्रभागेच्या काठावरती लागलाय मृदंग वाजायला...’ या संध्या यांच्या सोलो भजनाने हॉलमधील उपस्थित महिलांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले. तसेच यांच्या भजन समाप्तीसमयी टाळ्यांचा कडकडात झाला. त्यानंतर नाम पुकाचे पुकाचे, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, भजनाला चला आता भजनाला चला यासह हिंदी भजन गयनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्पर्धांच्या मध्ये-मध्ये छोटे खेळ घेण्यात आले. त्यातील विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल पारितोषिके देण्यात आली.या स्पर्धेचे विजेते- भक्ती भजनी मंडळ तृतीय, भगवान बाब भजनी मंडळ द्वितीय, अभिनव भजनी मंडळ प्रथम, अष्टविनायक भजनी मंडळ प्रथम, जागृत महिला भजनी तृतीय, शुक्लेश्वर द्वितीय. तसेच सोलोमध्ये मंदा व्यवहारे तृतीय, उमा वर्मा द्वितीय, मनीषा डोईफोडे प्रथम. तसेच यावेळी अखिल भारतीय महिला संमेलनातील सोलो स्पर्धेसाठी सरोज पल्लोड प्रथम, भारती लाजोरिया द्वितीय तर ग्रुपमध्ये माहेश्वरी भजनी मंडळ. यावेळी अखिल भारतीय महिला मंडळाच्या अध्यक्ष कांचन जैस्वाल, सावित्री बाफना, ललिता मुथा, प्रमिला दुसाद, ऊर्मिला अग्रवाल, सुनंदा लाहोटी, माधुरी धुप्पड, ललिता कर्वा, नंदा मुथा आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षण वैशाली कुर्तुडीकर व जयश्री मग्गीरवार यांनी केले. तसेच रूपराणी देवरा, स्वाती मालशेटवार यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती लड्डा, उमा जैस्वाल, पुष्पा लड्डा यांनी परिश्रम घेतले.