अ.भा.मा.म. संमेलनतर्फे भजन स्पर्धा उत्साहात

By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:36:09+5:302014-07-13T00:45:33+5:30

औरंगाबाद : ‘चंद्रभागेच्या काठावरती लागलाय मृदंग वाजायला...’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ यासारख्या भजनांनी कलश मंगल कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला

ABMM Meet the bhajan competition by the seminar | अ.भा.मा.म. संमेलनतर्फे भजन स्पर्धा उत्साहात

अ.भा.मा.म. संमेलनतर्फे भजन स्पर्धा उत्साहात

औरंगाबाद : ‘चंद्रभागेच्या काठावरती लागलाय मृदंग वाजायला...’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ यासारख्या भजनांनी कलश मंगल कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला, निमित्त होते अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनातर्फे आषाढी एकादशीनिमित्त घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेचे.
या स्पर्धेत शहरातील विविध भागांतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सोलो भजन गायन, ग्रुप भजन गायन, असे दोन भाग करण्यात आले होते. या दोन्ही मिळून एकूण ६० जणांचा सहभाग होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी नावंदर, आशा शहरवाला यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दीप प्रज्वलनानंतर सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून नियम सांगण्यात आले. तसेच सर्व स्पर्धकांना अवश्यक आसलेले वादन साहित्य आपण आपले आणायला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व स्पर्धकांनी आपापले साहित्य सोबत आणून उत्कृष्ट सादरीक रण केले.
कोणी वेशभूषेत तर कोणी शब्दोच्चाराने श्रोत्यांना आकर्षित करीत होते. काही ग्रुपने तर भजनासाठी आवश्यक असणाऱ्या वेशभूषेत येऊन श्रोत्यांना मोहित केले. यात ‘या या पाडुरंगाचे पाय पाहू चला...’ या भक्ती भजनी मंडळाच्या भजनाने स्पर्धेस सुरुवात झाली. त्यानंतर उमा वर्मा यांनी सोलोमध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या भक्तिगीतासह आपल्या सुंदर आवाजाने श्रोत्यांना आपल्याकडे आकर्षित केले. ‘चंद्रभागेच्या काठावरती लागलाय मृदंग वाजायला...’ या संध्या यांच्या सोलो भजनाने हॉलमधील उपस्थित महिलांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले. तसेच यांच्या भजन समाप्तीसमयी टाळ्यांचा कडकडात झाला. त्यानंतर नाम पुकाचे पुकाचे, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, भजनाला चला आता भजनाला चला यासह हिंदी भजन गयनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्पर्धांच्या मध्ये-मध्ये छोटे खेळ घेण्यात आले. त्यातील विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेचे विजेते- भक्ती भजनी मंडळ तृतीय, भगवान बाब भजनी मंडळ द्वितीय, अभिनव भजनी मंडळ प्रथम, अष्टविनायक भजनी मंडळ प्रथम, जागृत महिला भजनी तृतीय, शुक्लेश्वर द्वितीय. तसेच सोलोमध्ये मंदा व्यवहारे तृतीय, उमा वर्मा द्वितीय, मनीषा डोईफोडे प्रथम. तसेच यावेळी अखिल भारतीय महिला संमेलनातील सोलो स्पर्धेसाठी सरोज पल्लोड प्रथम, भारती लाजोरिया द्वितीय तर ग्रुपमध्ये माहेश्वरी भजनी मंडळ. यावेळी अखिल भारतीय महिला मंडळाच्या अध्यक्ष कांचन जैस्वाल, सावित्री बाफना, ललिता मुथा, प्रमिला दुसाद, ऊर्मिला अग्रवाल, सुनंदा लाहोटी, माधुरी धुप्पड, ललिता कर्वा, नंदा मुथा आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षण वैशाली कुर्तुडीकर व जयश्री मग्गीरवार यांनी केले. तसेच रूपराणी देवरा, स्वाती मालशेटवार यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती लड्डा, उमा जैस्वाल, पुष्पा लड्डा यांनी परिश्रम घेतले.

Web Title: ABMM Meet the bhajan competition by the seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.