आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षणाने येते : राम भोगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:03 IST2021-03-01T04:03:27+5:302021-03-01T04:03:27+5:30

भराडी येथील स. भु. प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष साळवे व सहशिक्षक प्रदीप महाजन यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळाप्रसंगी ते बोलत होते. ...

The ability to meet challenges comes from education: Ram Bhogle | आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षणाने येते : राम भोगले

आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षणाने येते : राम भोगले

भराडी येथील स. भु. प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष साळवे व सहशिक्षक प्रदीप महाजन यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोगले यांच्या हस्ते अटल लॅबच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल हे होते. व्यासपीठावर सुभाष साखला, प्रसाद कोकीळ, काकासाहेब राकडे, सत्कारमूर्ती सुभाष साळवे, प्रदीप महाजन, नीलेश सोनटक्के, सुरेश महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी साळवे व महाजन यांचा भोगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना भोगले म्हणाले, शिक्षणाचे बीज सकारात्मक परिवर्तनासाठी असावे. ग्रामीण भागातील आव्हानाबरोबरच जीवनातील आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षणाने येत असते. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शिक्षकांनी अध्यापन करणे गरजेचे आहे. तर केंद्र शासनाने लागू केलेले नवीन शैक्षणिक धोरण त्यावरच आधारित आहे. केंद्र शासनाकडून शाळेसाठी अटल लॅबची उभारणी होत आहे. याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना करून देण्याचे आवाहन करून भोगले यांनी केले. प्रास्ताविक महेश बहाळकर यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय डोलारे, सुनंदा भाले यांनी केले. गजानन सोनवणे यांनी आभार मानले.

Web Title: The ability to meet challenges comes from education: Ram Bhogle