वचन साहित्यात देश बदलण्याचे सामर्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 23:34 IST2017-04-15T23:25:54+5:302017-04-15T23:34:17+5:30
लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़

वचन साहित्यात देश बदलण्याचे सामर्थ्य
लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात केवळ एक व्यक्ती, समाज, धर्म, पंथ नव्हे तर अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़ यासाठी हे साहित्य अवलोकन, पठण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बेंगळुरूच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी शनिवारी येथे केले़
अखिल भारतीय वीरशैव साहित्य मंडळ नागपूर व महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील औसा रोड येथील कस्तुराई मंगल कार्यालयात आयोजित धर्मवीर श्री देशीकेंद्र महाराज साहित्य नगरीत दोन दिवसीय सातव्या अखिल भारतीय मराठी शरण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ संमेलन अध्यक्ष विजयाताई तेलंग यांची उपस्थिती होती़
यावेळी भालकी पीठाचे बसवलिंग पट्टदेवरू, अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ़ सुधाकर मोगलेवार, महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, स्वागत अध्यक्ष विश्वनाथ निगुडगे, माजी खासदार डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी कुलगुरू डॉ़ शिवराज नाकाडे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, अॅड़ मनोहरराव गोमारे, यांची प्रमुख उपस्थिती होती़ शरणसत्व स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन झाले़ सुत्रसंचालन प्रा़भीमराव पाटील यांनी केले़ यशस्वीतेसाठी शिवदास लखादिवे, गुरूलिंग वागदरे, माधवराव पाटील टाकळीकर, उमाकांत कोरे, राजेश्वर डांगे आदी परिश्रम घेत आहेत़