जातेगावच्या मोठ्या महादेवाला तीर्थकुंडातील पाण्याने अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:57 IST2017-08-06T23:57:16+5:302017-08-06T23:57:16+5:30
परंपरेनुसार भाविकांनी वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंडातील पवित्र पाणी भोपळ्यात नेऊन मोठा महादेव (जातेगाव, ता. नांदगाव) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला.

जातेगावच्या मोठ्या महादेवाला तीर्थकुंडातील पाण्याने अभिषेक
लोकमत न्यूज नेटवर्क
वेरूळ : येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात तिसºया सोमवारच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी दुपारपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंपरेनुसार याही वर्षी खेड्यापाड्यांतून आलेल्या भाविकांनी येथील शिवालय तीर्थकुंडातील पवित्र पाणी
भोपळ्यात नेऊन मोठा महादेव (जातेगाव, ता. नांदगाव) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला.
जलाभिषेक करून पुन्हा परत शिवालय तीर्थकुंडामध्ये स्नान करून श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यावर श्रावण महिन्यातील मोठ्या महादेवाची पायी यात्रा सफल होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वेरूळकडे येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीची गर्दी लक्षात घेता गल्लेबोरगाव ते वेरूळ या रस्त्यावरून जाणारी सर्वच वाहने सकाळी ९ पासून बंद करण्यात आली आहे. तसेच पायी जाणाºया भाविकांसाठी पूर्ण यात्रा मार्गावर चहा-पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वेरुळच्या शिवालय तीर्थकुंडावर वेरूळची काठी, रेबीन, भोपळे, चमकीची मोठी विक्री झाली. सपोनि. एकनाथ पाटील,
पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो. कॉ. भाऊसिंग जारवाल, यतीन कुलकर्णी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.