शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:19 IST

फुलंब्री हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असून येथून जेष्ठ नेते राज्यपाल हरिभाऊ बागडे आमदार होते

फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपमध्ये फारसे सख्य नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून केलेला उल्लेख, त्यानंतर सत्तार समर्थकांचा या व्यक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा यामुळे महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच भाजपचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ फुलंब्री येथून माजी सभापती किशोर बलांडे यांची उमेदवारी पालकमंत्री सत्तार यांनी आज सकाळी एका कार्यक्रमातून जाहीर केल्याने युतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यत आहे. 

फुलंब्री हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. येथून भाजपाचे जेष्ठ नेते राज्यपाल हरिभाऊ बागडे आमदार होते. बागडे राज्यपाल झाल्यानंतर भाजपमधून अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू किशोर बलांडे यांनी देखील 'लढणार आणि जिंकणार' असे बॅनर मतदारसंघात लावल्याने शिंदेसेनेचा दावा देखील दाखल झाला. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील किशोर बलांडे हे जिल्हा परिषदमध्ये बांधकाम सभापती होते. त्यांनी मागील एक वर्षापासून फुलंब्री मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठिंब्यातून त्यांनी मतदार संघात २५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करून आणली. याच कामांचा आज सकाळपासून विविध गावात पालकमंत्री सत्तार यांनी शुभारंभ केला. 

लढणार अन् जिंकणारदरम्यान, निधोना येथील विकास कामांचा शुभारंभाप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी किशोर बलांडे हे फुलंब्री विधानसभेसाठी उमेदवार असतील, त्यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन ग्रामस्थांना केले. तसेच किशोर बलांडे यांना मराठा आरक्षण लढ्यातील मोठ्या नेत्याचा पाठिंबा असल्याचेही सत्तार यांनी जाहीर केले. मला विधानसभेत जोडीदार असावा म्हणून मी बलांडे यांना येथून उमेदवार करीत आहे. त्यांच्यासाठी धनुष्यबाण चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न करू, काही कारणांनी नाहीच मिळाले तरी बलांडे हे अपक्ष लढणार आणि जिंकणार. माझ्यावतीने त्यांना पूर्ण मदत राहणार आहे असे जाहीर केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४phulambri-acफुलंब्रीAbdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक