शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांचे भाजपाला धोबीपछाड; बाजार समिती निवडणुकीत सर्व १८ उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:21 IST

भाजप व शिवसेना यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

सिल्लोड: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलच्या सर्व १८ पैकी १८ उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपाच्या पॅनलचा धुव्वा उडवत मंत्री सत्तार किंग मेकर ठरले आहेत.

भाजप व शिवसेना यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अब्दुल सत्तार हे पणन मंत्री असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. २८ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत तब्बल ९४ टक्के मतदान झाले होते. आज शेवंताबाई मंगल कार्यालयात सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ वाजता सर्व जागांचे निकाल हातात आले. यात शिवसेनेच्या पॅनलचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले. ९ अपक्ष उमेदवारांसहित भाजपच्या पॅनलचा सफाया करत सत्तार यांनी सर्वांना धोबीपछाड दिला. दुपारी सिल्लोड शहरातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

शिवसेनेचे १८ विजयी उमेदवार असे : - शिवसेना (शिंदे)गटाचे सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून :-श्रीरंग साळवे, अरुण शिंदे, केशवराव तायडे, प्रभाकर काळे, दामोधर गव्हाणे, जयराम चिंचपुरे,सुनील पाटणी.- सहकारी संस्था महिला:- शालिनीरहाटे , अनुसयाबाई मोरे- इतर मागासवर्गीय:- नंदकिशोर सहारे.- विमुक्त जाती भटक्या जमाती:- सतिष ताठे.- ग्राम पंचायत सर्वसाधारण:- विश्वास दाभाडे, दारासिंग चव्हाण- अ.जा.अ.ज:- राजाराम पाडळे.- दुर्बल घटक:- संदीप राऊत.- व्यापारी मतदारसंघ:-रमेश लाठी ,भावराव लोखंडे.- हमाल मापाडी:-शेख जावेद हे १८ उमेदवार बहुमताने निवडून आले

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकmarket yardमार्केट यार्ड