शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 20:30 IST

'माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे.'

औरंगाबाद: आज औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात हिंदू गर्जना मेळावा आणि संदीपान भुमरे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी आगामी स्थानिक निवडणुका आणि भाजपसोबतच्या युतीबाबत मोठा दावा केला.

'जनतेची साथ मिळाल्यावर...'या कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार म्हणतात की, 'मंत्रिपदं येतील-जातील, पण कार्यकर्ता हे पद जात नाही. चांगली कामे केल्यावर लोकांची साथ मिळते, त्यांची शक्ती मिळते. लोकांची साथ मिळाल्यानंतर राजकारणाच्या ट्रॅकवर अडथळे आले, तरीही गाड्या सरळ मुंबईला जातात. पण, जनतेने स्विकारले नाही, तर कोणी वखरावरही ठेवत नाही.'

'युती कशी होईल, याबाबत मला शंका'ते पुढे म्हणतात की, 'आगामी काळात आपल्याला मेहनत करायची आहे. लवकरच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका आहेत. आमच्या जिल्ह्यात सध्या वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव, अशा तीनच नगरपालिका आहेत, बाकी सगळ्या डिझॉल्व्ह झाल्या. तर, नगरपंचायत फक्त फुलंब्रीमध्ये आहे, त्याचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. काही दिवसांपूर्वीच सोयगावची निवडणूक झाली. त्यात 17 नगरसेवक आमचे आणि 2 भारतीय जनता पक्षाचे आले. सिल्लोडमध्येही तीच परिस्थिती, 28 माझे आणि 2 भाजपचे आहेत. आता पुढची युती कशी होईल, याबाबत मला शंका आहे.'

'माझी भाजपला विनंती आहे' 'दोन जागांवर भाजपचे समाधान होऊ शकत नाही आणि 2 पेक्षा जास्त जागा मी देऊ शकत नाही. माझ्यासमोर ही मोठी अडचण आहे. आपण भविष्यात नक्की सोबत निवडणूक लढवू पण, ज्याची शक्ती जास्त असेल त्याला जागा मिळतील. आपल्या आगामी निवडणुका नक्कीच मैत्रीपूर्ण होतील. माझी भाजपला विनंती आहे की, पक्ष वाढवायचा असेल तर स्थानिक निवडणुका मैत्रीपूर्ण वातावरणात होऊ द्या. इतर तालुक्यातील मला माहित नाही, पण माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, मी त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे,' असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे