तांडे-वाड्यापर्यंत आरोग्य सुविधा पुरविणार-अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST2021-05-05T04:04:26+5:302021-05-05T04:04:26+5:30
-जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रयत्नातुन आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन -जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन वाळूज महानगर : ...

तांडे-वाड्यापर्यंत आरोग्य सुविधा पुरविणार-अब्दुल सत्तार
-जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रयत्नातुन आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन
-जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन
वाळूज महानगर : तांडे-वाड्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करू अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून गिरनेरा तांडा व वडगाव खुर्द येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे व्हर्चुअल उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते शनिवारी (दि.१) करण्यात आले.
गिरनेरा तांडा व वडगाव खुर्द येथे प्रत्येकी ४० लाख रुपये खर्च करुन जि.प.सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. या प्रसंगी जि.प.अध्यक्षा मीना शेळके, जि.प.सदस्य रमेश गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जि.प.चे बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, वैद्यकीय अधिकारी एन. एम. पवार, सरपंच सुनीता राठोड, उपसरपंच सुभाष आडे, माजी सरपंच साजन पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात मंत्री सत्तार यांनी रमेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांनी पंढरपूर जि.प.सर्कलमध्ये जवळपास ४० कोटी रुपयांची विविध कामे केल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील तांडे-वाड्यावर आरोग्य सुविधा पोहोचविणार असल्याचे ते म्हणाले. सरपंच सुनीता राठोड यांनी ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी देण्याची मागणी करताच सत्तार यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी रमेश गायकवाड यांनी सर्कलमध्ये केलेल्या विविध विकासकामाची माहिती दिली. कार्यक्रमाला ग्रामसेवक चाटे, शेख अजीज, नीलेश चव्हाण, संघर्ष बोलधणे, दीपिका चव्हाण, मनोज पवार, सुभाष जाधव, सुमनबाई राठोड, कौसाबाई राठोड, सोजर खान, मुन्नी बाजी, मुक्ताबाई राठोड, लक्ष्मण चव्हाण, प्रतीक गायकवाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
फोटो ओळ- गिरनेरा तांडा व वडगाव खुर्द येथे आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा व बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी जि.प.सदस्य रमेश गायकवाड, सरपंच सुनीता राठोड व पदाधिकारी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- उद्घाटन
------------------------