शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस बॅगांच्या फोनमुळे उडाली धावपळ; बॅगांमध्ये सापडले सुरा, कत्ती अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 17:19 IST

पोलीस पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे बॅग ठेवणारी एक महिला व मुलीला शोधून काढले.

औरंगाबाद :पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला उल्कानगरीत बेवारस बॅगा ठेवल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. त्यानंतर आयुक्तालयात एकच धावपळ उडाली. बॉम्बशोधक नाशक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रकारची तपासणी करीत दक्षता घेऊन बॅगा उघडल्यानंतर त्यात कपडे, एक चाकू अन् कत्ती आढळली. त्यानंतर पथकाने सुटकेचा नि:श्वास टाकला. घटनेची जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

जवाहरनगरच्या ११२ डायल नंबरवर एका व्यक्तीने उल्कानगरीतील वर्धमान रेसिडेन्सीजवळील बोळीत तीन बेवारस बॅगा ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत त्याविषयी नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सायंकाळी ४:५३ वाजता कळविले. तेव्हा नियंत्रण कक्षाने तत्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकास पाचारण केले. पथकाचे निरीक्षक सुशील जुमडे, नाईक महादेव शिरसाठ, गोपाल पुर्भे यांच्यासह श्वान गौरीसह तिचे हस्तक अशोक थोरात काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी जवाहरनगरचे उपनिरीक्षक संतोष राऊत, हवालदार काळे, अंमलदार शेळके, नागरे, राठोड हे सुद्धा पोहोचले. बॉम्बशोधक पथकाने सर्व प्रकारची काळजी घेत बॅगांची तपासणी केली. श्वानानेही बॅग तपासल्या. त्यानंतर तिन्ही बॅगा उघडण्यात आल्या. तेव्हा त्यात घरात टाकून देण्यायोग्य कपडे, गंजलेला सुरा, कत्तीसह इतर साहित्य आढळले. हे सर्व साहित्य जवाहरनगर पोलिसांनी जप्त करीत ठाण्यात आणले.

रिकामी जागा पाहून ठेवल्या बॅगानिरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष राऊत यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे बॅग ठेवणारी एक महिला व मुलीला शोधून काढले. ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी घरातील गंजलेल्या वस्तू, कपडे कचरा गाडीत घेत नाहीत. त्यामुळे ते तीन बॅगांमध्ये भरून कोणी पाहणार नाही, अशा ठिकाणी ठेवल्याची कबुली त्यांनी दिली. त्याविषयीची नोंद करून त्यांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस