अ.भा. मराठा महासंघाचा राजेंद्र दर्डा यांना पाठिंबा

By Admin | Updated: October 11, 2014 00:40 IST2014-10-11T00:33:36+5:302014-10-11T00:40:34+5:30

औरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांना आज शुक्रवारी अखिल भारतीय मराठा महासंघाने बिनशर्त पाठिंबा दिला.

AB Support for the Maratha Mahasangh's Rajendra Darda | अ.भा. मराठा महासंघाचा राजेंद्र दर्डा यांना पाठिंबा

अ.भा. मराठा महासंघाचा राजेंद्र दर्डा यांना पाठिंबा

औरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांना आज शुक्रवारी अखिल भारतीय मराठा महासंघाने बिनशर्त पाठिंबा दिला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी आज राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र दर्डा यांचे कार्य अतुलनीय आहे. शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावला. डीएमआयसीमुळे भूमिपुत्रांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील पहिले शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादेत उभारून त्यांनी रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घातली आहे. त्यांचे हे कार्य पुढेही चालू राहण्यासाठी पूर्व मतदारसंघातून त्यांना निवडून आणण्यासाठी मराठा महासंघाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मराठवाडा सरचिटणीस गोपळराव चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब दिघे, जिल्हा प्रवीण ढोकणे, शहराध्यक्ष सुरेश डिडोरे यांची उपस्थिती होती.

Web Title: AB Support for the Maratha Mahasangh's Rajendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.