आष्टा शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण
By Admin | Updated: February 4, 2017 23:41 IST2017-02-04T23:39:00+5:302017-02-04T23:41:21+5:30
चाकूर : किरकोळ कारणावरून सात पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केल्याची घटना घडली

आष्टा शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण
चाकूर : किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या सात पालकांनी मुख्याध्यापकास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना आष्टा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवारी घडली आहे़
आष्टा येथील फक्रुद्दीन शेख व अन्य सहाजण संगनमत करून आष्टा शाळेत गेले़ त्यांनी किरकोळ कारणावरून मुख्याध्यापक दिलीप मानखेडे व अन्य एकास मारहाण केली़ तसेच शासकीय कामात अडथळा आणला़