शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
2
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
3
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
4
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
5
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
6
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
7
"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
8
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
9
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
10
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
11
"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
12
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
13
विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?
14
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
16
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
17
मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले
18
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
19
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
20
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी विद्यार्थ्यांचा १३ रोजी मुंबईत आक्रोश महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:14 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने १३ मार्च रोजी मुंबई येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आयोजन समितीचे बाळासाहेब सानप यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, राज्यात लाखो विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देत असतात. मात्र, एकूण रिक्त पदांपैकी १० टक्केच पदांसाठी परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया केली जाते. यामुळे एका पदासाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यात सरकारने आता कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरूकेली आहे. यामुळे अनेक सरकारी कार्यालयांत तुटपुंज्या पगारात युवक नोकर्‍या करीत आहेत. वरचा मलिदा कंत्राटदार खात आहेत. सरकारने कंत्राट पद्धत बंद करावी, तसेच नोकरभरतीवरील निर्बंध हटवावेत. सरळ सेवेतील ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी मुंबईत १३ मार्च रोजी आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे.  अ‍ॅड. राहुल तायडे यांनी सांगितले की, या राज्यातील १ लाख युवक मुंबईतील महामोर्चात सहभागी होणार आहे.  यावेळी डॉ. कुणाल खरात, सचिन डोईफोडे, नीलेश आंबेवाडीकर, वैभव मिटकर व संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  

प्रमुख मागण्या- शिक्षकांची रिक्त २४ हजार पदे तात्काळ भरावीत.- जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा बंद करूनयेत. - जि.प.जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास विभागातील जागा १०० टक्के भराव्यात. - सर्व स्पर्धा परीक्षा शुल्क १०० ते २०० रुपयांपर्यंत आकारण्यात यावे. - सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह २ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. - भरती प्रक्रियेसंदर्भात तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा. 

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद