आघाव,अ. गफ्फार यांना राष्ट्रपती पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:45 IST2018-01-24T23:45:11+5:302018-01-24T23:45:43+5:30
पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश लक्ष्मीनारायण आघाव आणि राज्य राखीव पोलीस दलातील (भारत बटालियन) पोलीस उपनिरीक्षक अब्दुल गफ्फार अब्दुल खान यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले.

आघाव,अ. गफ्फार यांना राष्ट्रपती पोलीस पदक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश लक्ष्मीनारायण आघाव आणि राज्य राखीव पोलीस दलातील (भारत बटालियन) पोलीस उपनिरीक्षक अब्दुल गफ्फार अब्दुल खान यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले.
आघाव यांना २३ वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पदक जाहीर झाले. आघाव हे १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदावर पोलीस दलात रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग नागपूर शहर पोलीस दलात होती. तेथे त्यांनी खंडणीखोर गँगच्या मुसक्या आवळल्या, नागपूर विद्यापीठ परीक्षा घोटाळ्याचा तपास केला. तब्बल ४२४ वाँटेड गुन्हेगारांना त्यांनी जेलमध्ये डांबले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी आणि औरंगाबाद ग्रामीणमधील बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून काम करीत असताना त्या परिसरातील पारधी समाजाच्या गुन्हेगारीविषयक अभ्यास करून पोलीस महासंचालक यांना प्रबंध सादर केला. या कालावधीत त्यांनी चोरी, दरोडे आणि जबरी चोरीचा तपास करून तब्बल २९ लाख ९ हजार ८०५ रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली. औरंगाबाद शहर पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून काम करीत असताना त्यांनी केबीसी घोटाळा, सेल्स टॅक्स विभागाचे प्रकरण, बामू विद्यापीठातील अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरण, डीलक्स बेकरी दरोडा, मन्नपुरम गोल्डमधील दरोडा, चित्रा डकरे खून प्रकरण, वर्धन घोडे अपहरण आणि खुनाचा तपास करून आरोपींना (पान २ वर)