शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

‘आधार’ने शाळा बेजार अन् पालक बसले थंडगार; पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे अपडेटिंग राहिले

By विजय सरवदे | Updated: May 6, 2023 12:53 IST

या संदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आता मेटाकुटीला आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर :शाळास्तरावर मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटिंगचे काम सुरू आहे. यासाठी ३० एप्रिलची दिलेली डेडलाइन संपली. तरीही अजून तब्बल १ लाख ८६ हजार ४६६ विद्यार्थ्यांचे आधार अपडेशन झालेले नाही. यापुढे विद्यार्थ्यांचे ‘आधार’ नाही, तर शाळांना कोणत्याही योजनेचे अनुदान ना शिक्षकांना पगारही नाही, ही भूमिका शासनाने घेतली असल्यामुळे आधार कार्ड अपडेशनसाठी शाळा रात्रंदिवस झटत आहेत. या संदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आता मेटाकुटीला आले आहेत.

यापुढे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरच संचमान्यता होणार आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील साडेचार हजारांपैकी ७५ टक्के शाळांचे आधार अपडेशन रखडले आहे. परिणामी, संचमान्यताही खोळंबली आहे. संचमान्यतेत जेवढे आधार कार्ड, तेवढीच पटसंख्या गणली जाणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

संचमान्यतेसाठी शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि प्रमाणीकरण बंधनकारक केले होते. मात्र, पोर्टल सतत हँग होत असल्यामुळे शाळांना आधार अपडेट करण्यास अडचणी येत होत्या. अनेकदा काही विद्यार्थ्यांची आधारवरील माहिती जुळत नाही. या संदर्भात शाळांनी पालकांशी संपर्क साधला; पण पालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. शिक्षण विभागाकडून आधार डेटा बेससंबंधी वारंवार आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आता अनेक मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले आहेत.

अखेर शिक्षणाधिकाऱ्यांची विनंतीआधार अपडेशनची मुदत संपलेली असली, तरी आठ-दहा दिवसांची आणखी मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. आता स्टुडंट्स पोर्टलही सुरळीत झाले आहे. काही मुख्याध्यापकांनी आधार अपडेशनकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. त्यामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांची आधार अपडेशनची प्रक्रियाच झालेली नाही, तर ९२ हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. यासाठी हात जोडून विनंती करतो की, आधारमुळेच आपला टिकाव लागणार आहे. यामुळे आधार अपडेशनची प्रक्रिया गतिमान करा.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी

आकडेवारी : ४,५०० शाळा९,१७,८९५ विद्यार्थी८,९९,५९२ विद्यार्थ्यांचे आधार प्राप्त१८,३०३ विद्यार्थ्यांचे आधारच नाही७,३१,४२९ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण१,८६,४६६ विद्यार्थ्यांचे अपडेटिंग रखडले

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSchoolशाळाAurangabadऔरंगाबाद