आडस सोसायटी भाजपाकडे
By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:31:27+5:302015-08-31T13:46:40+5:30
येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांचा धुव्वा उडवत रविवारी दणदणीत यश मिळविले.

आडस सोसायटी भाजपाकडे
आडस : येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांचा धुव्वा उडवत रविवारी दणदणीत यश मिळविले.
१३ सदस्यांच्या सोसायटीमध्ये रमेश आडसकर यांचा वरचष्मा आहे. रविवारी मतदान प्रक्रिया झाली. ९८७ पैकी ९0३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर झाला. ज्ञानोबा नेटके, पांडूरंग म्हेत्रे, श्रीमंत तागड बिनविरोध निघाले होते. राजाभाऊ आकुसकर, ऋषीकेश आडसकर, सूर्यकांत आकुसकर, शेख खाजा, संगीता कोटे, शिवाजी शेंडगे, उध्दव इंगोले, मीरा सपकाळ, किसन खाडे मोठय़ा फरकाने विजयी झाले.
माजी आ. बाबूराव आडसकर, रमेश आडसकर, मेघराज आडसकर यांनी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)