शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:29 IST

पीडितेला नुकसानभरपाईसाठी निकालाची प्रत जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग व बोलण्याचा प्रयत्न करून लग्नाचा तगादा लावणारा अक्षय युवराज गायकवाड (२२, रा. उस्मानपुरा) याला मुलीच्या घरात शिरून, तिचा विनयभंग करत शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी ५ वर्षे सश्रम कारावास आणि पोक्सोसह विविध कलमांखाली ६ हजार रुपये दंड ठोठावला.       पीडितेला नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी निकालाची प्रत जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्याचेही आदेशात म्हटले आहे.

याबाबत १७ वर्षांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बऱ्याच दिवसांपासून तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. कधी दारू पिऊन पीडितेच्या घरासमोर उभा राहून तिच्या नावाने आरडाओरड करीत असे. तो गुंड प्रवृत्तीचा व त्याची मोहल्ल्यात दहशत असल्याने पीडितेच्या आई- वडिलांनी पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ केली होती. आरोपीने मुलीच्या लहान भावाला रस्त्यात गाठून ‘तुझ्या बहिणीला माझ्यासोबत लग्न करण्यास सांग, नाही तर तुला मारून टाकीन’, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ३० मार्च २०१९ रोजी दुपारी घटना घडली होती.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारचे २ गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार अश्पाक कादरी यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी