शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस चिरडून वाहनाने ३० फुट फरफटत नेले; एक महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 12:13 IST

देव दर्शनासाठी गेलेल्या महिला भाविकांना अज्ञात वाहनाने चिरडले

वाळूजमहानगर (औरंगाबाद) : वाळूज उद्योग नगरीतील वैष्णवीदेवी  मंदिरात दर्शनासाठी चालेल्या महिला भाविकास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास पंढरपूर भाजी मंडई समोर घडली. या भीषण अपघातात मंगलबाई विठ्ठल शहाणे (62, रा. सिडको महानगर) या जागीच ठार झाल्या. तर सुभद्राबाई तुळशीराम राऊत(42 रा सिडको वाळूजमहानगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

प्राथमिक माहिती नुसार, सिडको वाळूजमहानगरातील विट्ठल शहाणे हे पत्नी मंगलबाई आणि नातेवाईक सुभद्राबाई तुळशीराम राऊत यांच्यासह आज सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. विठ्ठल शहाणे हे दोघींना पंढरपूरच्या तिरंगा चौकात सोडून मॉर्निंग वॉक साठी निघून गेले. त्यानंतर वैष्णवी देवी मंदिरात दर्शनासाठी पंढरपुरमार्गे दोघी निघाल्या. दरम्यान, सकाळी 6 वाजेच्या सुमारास वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या  अज्ञात वाहनाने या दोघींना पाठीमागून जोराची धडक दिली. 

या अपघातात वाहनांच्या चाकाखाली सापडलेल्या मंगलबाई शहाणे यांना वाहनाने जवळपास 30 फूट फरफटत नेले. वाहनाचे चाक कमरेवरून गेल्याने शहाणे यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर सुभद्राबाई तुळशीराम राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक राजेंद्र बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. जखमीस 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर चालक घटनास्थळाहून वाहनासह पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू