शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पावसाळ्यातच एक हजार रुपयाला टॅंकर; उन्हाळ्यात काय होणार?

By विकास राऊत | Updated: September 11, 2023 15:05 IST

महापालिका अनियमित पाणीपुरवठा करीत असल्यामुळे अनेक भागात टँकरविना पर्याय नाही.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात आतापर्यंत ६२ टक्के पाऊस झाला आहे. सध्या ३० टॅंकर सुरू झाले आहेत. एका टॅंकरचा भाव एक हजार रुपये आहे. नागरिकांना सध्या खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागते आहे. महापालिका अनियमित पाणीपुरवठा करीत असल्यामुळे अनेक भागात टँकरविना पर्याय नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात ६२ टक्के पाऊस ....आतापर्यंत जिल्ह्यात ६२ टक्के पाऊस झाला आहे.३६२ मिमी पाऊस ५८१ वार्षिक सरासरीच्या तुलनेत झाला आहे.

पावसाळ्यातच ३० टॅंकरने पाणीछत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ११, फुलंब्री तालुक्यातील १, पैठण २०, गंगापूर १ आणि सिल्लोड तालुक्यातील ६ गावांमध्ये ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

एका टॅंकरचा भाव एक हजारसध्या ५ हजार लिटरचे टँकर ५००, तर १० हजार लिटरचे टँकर १ हजार रुपयांना मिळते आहे. येत्या उन्हाळ्यात यात वाढ होणे शक्य आहे.

शहराला सहा दिवसाआड पाणी शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात नागरिकांना खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागते आहे.

उन्हाळ्यात काय होणार?आमच्या भागात नळ योजना नाही. मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ते पाणी पुरत नाही, त्यामुळे खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागते.- मधुकर गायकवाड

महिन्यातून एकदा तरी टँकर लागतेमहिन्यातून एकदा खासगी टँकर मागवावे लागते. सध्या ही परिस्थिती आहे. यंदा पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात काय होणार याची कल्पना करवत नाही.- एल. बी. सोनवणे

कोणत्या तालुक्यात किती टॅंकर?तालुका .............. टॅंकरछत्रपती संभाजीनगर ...९पैठण...,..............१४गंगापूर...............१फुलंब्री..............१सिल्लोड..............५

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका