शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने धावता ट्रक रस्त्यावर उलटला; दैवबलवत्तर म्हणून तिघे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:11 IST

ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

करमाड (औरंगाबाद) : झारखंड येथून औरंगाबादकडे कोंबडीचे खाद्य घेऊन जाणारा ट्रॅकचा करमाडजवळ उलटला. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले. मात्र, भररस्त्यात ट्रक उलटून त्यातून पोती रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. 

झारखंड राज्यातील रायपूर येथून कोंबडीचे खाद्य घेऊन एक ट्रॅक ( क्र. डब्ल्यू बी ६७: B.९७६१) औरंगाबादकडे येत होता. दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान करमाड गावाजवळ मागील टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॅक पुलावर उलटला. यावेळी दुचाकीवरून ( एम एच .२०. जी एच ०३४८)  जाणारे मांडकी येथील रहिवासी सुभान बाबन शहा (४०), आसिफ शहा (१६) व अरबाज शहा (१२) हे ट्रकचा धक्का लागून बाजूला फेकले गेले. दैव बलवत्तर होते म्हणून तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, चालक पिकुंराणा (३०) व क्लिनर रुपेश (२२) हे दोघे जखमी झाले. रुपेश याला जास्त मार लागल्याने त्याला करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन. जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने वाहतूक कोंडी  झाली होती. करमाड पोलिसांनी एकेरी वाहतूक करून वाहनांची कोंडी फोडली. पुढील तपास बीट जमादार सुभाष भाकरे, पोलीस नाईक जारवाल करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात