शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

धावत्या सीएनजी कारने घेतला पेट; वेळीच कुटुंब गाडीतून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:49 IST

 बाहेरून सीएनजी किट बसविल्याने आग लागल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर : धावत्या सीएनजी कारला आग लागून जळून खाक झाली. आग लागत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने पती, पत्नी, तीन मुलांनी क्षणात बाहेर उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकासमोर हा अपघात घडला.

योगेश सुरासे (रा. जय भवानीनगर) कुटुंबासह क्रांती चौकाकडून महानुभाव आश्रमाच्या दिशेने जात होते. सायंकाळी त्यांच्या टाटा टिगॉर कारच्या समोरील भागातून शिट्टीसारखा आवाज निघून धूर निघण्यास सुरुवात झाली. हे लक्षात येताच योगेश यांनी तत्काळ कुटुंबाला बाहेर काढताच क्षणात कारने पेट घेतला. कारमध्ये सीएनजी गॅसकीट असल्याने वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव, वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक विवेक जाधव, अंमलदार कचरू हापसे, संदीप प्रधान यांनी धाव घेत नागरिक, अन्य वाहनांना दूर केले. अग्निशमन विभागाचे वसीम पठाण, संदीप चव्हाण यांनी जवानांसह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

सीएनजी टाकी फुटली नाही-अग्निशमनचे संदीप चव्हाण यांच्या माहितीनुसार, कारच्या बोनटपासून आगीस सुरुवात झाली. त्यामुळे इंजिन गरम झाल्याने किंवा सीएनजी गॅस गळती होऊनही आग लागू शकते. यात इंजिन जळून खाक झाले. आग नियंत्रणात आल्याने सीएनजी टाकी फुटली नाही.-निरीक्षक प्रविणा यादव यांच्या माहितीनुसार, सुरासे यांची ही सेकंडहँड कार आहे. त्यांनी कारच्या मूळ सेंटिंगमध्ये बदल करून बाहेरून सीएनजी गॅसकीट बसविली होती.

काय म्हणतात तज्ज्ञ ?स्वस्त दरामुळे सीएनजी किटकडे पाहिले जाते. मात्र, त्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केले जाते. किटची नियमित देखरेख करावी लागते. कंपनी, शासनाने आखून दिलेले नियम पाळणारी स्टँडर्ड किट वापरावी. किट कारच्या मागे असल्यानेही ओव्हरहिटिंग होऊ शकते. बाहेरून किट बसविण्यापेक्षा कंपनीचीच किट उत्तम असते. ज्या वाहनांना शिफारस नसते, त्या कारमधेही नागरिक किट बसवितात. परिणामी, इलेक्ट्रिक सेटिंगमध्ये बदल होऊनही गॅस गळती होऊन आग लागू शकते.- डॉ. सचिन बोरसे, विभागप्रमुख, मेकॅनिकल विभाग, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFire Brigadeअग्निशमन दलCrime Newsगुन्हेगारी