शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: डॉक्टरांच्या मदतीला गेलेल्या पोलिसांना बेल्टने मारहाण; रस्त्यावर बाप-लेकाची दादागिरी

By राम शिनगारे | Updated: August 7, 2023 12:43 IST

सिडको पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : शरद टी पॉइंट येथील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एक जण बेल्टने मारहाण करीत होता. डॉक्टरांच्या मारहाणीची तक्रार सिडको पोलिसांच्या ११२ वर आल्यानंतर दोन पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्यात गाडी लावलेल्या व्यक्तीस मारहाणीविषयी चौकशी करीत असतानाच तिघांनी मिळून एका पोलिस कर्मचाऱ्यास पकडून बेल्टने मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ६:३७ वाजता घडला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

डॉक्टरासह पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींमध्ये शिवानंद गजानन मोरे, गजानन मोरे आणि विजया गजानन मोरे (तिघेही रा. टी.व्ही. सेंटर, हडको) यांचा समावेश आहे. पोलिस अंमलदार उत्तम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शनिवारी सिडको ठाण्यातील ११२ नंबर गाडीवर ड्यूटीसाठी होते. एम्स हॉस्पिटलमधून एक जण डॉक्टरास मारहाण करीत असल्याचा फोन ११२ वर आला. त्यानुसार अंमलदार जाधव यांच्यासह अतुल सोळंके हे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा रस्त्यावर आरोपींची गाडी (एमएच २० जीई २५१९) लावलेली होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील गाडी बाजूला घेण्याच्या सूचना करीत असतानाच हॉस्पिटलमध्ये आरोपी शिवानंद मोरे हा हातात बेल्ट घेऊन उभा होता. त्याने पोलिसांनी मी गाडी बाजूला घेणार नाही. हॉस्पिटल जाळून टाकणार असे मोठमोठ्याने ओरडून सांगत होता. 

तेव्हा दोन्ही पोलिसांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली. तसेच फिर्यादीच्या गणवेशाची कॉलर पकडून बेल्टने मारहाण सुरू केली. तेव्हा आरोपी शिवानंद याचे आई-वडील गजानन व विजया या दोघांनी कर्मचाऱ्यास पकडले. त्यानंतर तोंडावर, डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. दुसरे कर्मचारी सोळंके हे यांनाही मारहाण केली. तेव्हा त्याठिकाणच्या काही नागरिकांनी पोलिसांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्यासह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदवला.

आरोपींची हर्सूलमध्ये रवानगीसिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींनी अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. त्यानुसार तिन्ही आरोपींना हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास अन्नलदास करीत आहेत.

जमाव नुसता बघत होता...मुलगा, बाप आणि त्याची आई पोलिस कर्मचाऱ्यास पकडून मारहाण करीत होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. सगळ्यांच्या गराड्यात पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केली जात होती. जेव्हा पोलिसांची संख्या वाढली तेव्हा जमाव सोडविण्यास पुढे आला. त्यानंतर जमावाने मुख्य आरोपी शिवानंद मोरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, इतर पोलिसांनी त्यास मारहाण करू दिली नाही, असे व्हिडीओवरून दिसून येत आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरलपोलिस कर्मचाऱ्यास तिघे जण गचांडी पकडून मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिलेसह तिघे जण मारहाण करीत असतानाही पोलिस कर्मचाऱ्याने मुख्य आरोपीला पकडून ठेवले होते. तेव्हा आरोपीच्या आई-वडिलांनी पोलिस कर्मचाऱ्यास मारले. मात्र, तरीही त्यांनी आरोपीला सोडले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस