शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:56 IST

टायरची पाहणी करत असताना अचानक ट्रेलरवर पीकअप टेम्पो धडकला

-रऊफ शेखफुलंब्री: समृद्धी महामार्गावर सावंगी शिवारात पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून येणारा पिकअप टेम्पोने धडकून आज पहाटे अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे

प्राथमिक माहितीनुसार, जालन्याहून समृद्धी महामार्गावरुन छत्रपती संभाजीनगरकडे एक ट्रेलर ( एमएच 21 बीएच 0456) येत होता. सावंगी शिवारात असलेल्या बोगद्यानजीक पेट्रोल पंपावर एका बाजूला ट्रेलर थांबवून चालक शुभम रामराव राठोड ( 30) टायरची पाहणी करत होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो ( एमएच 30 बिडी 6207) ट्रेलरवार धडकला. यात टायरची पाहणी करत असलेला चालक शुभमचा गाडीखाली दबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस, फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस, तसेच समृद्धी महामार्गाचे आरोग्य पथक घटनास्थळी पोहचले. मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुलंब्री पोलीस स्टेशनचे जमादार पंकज रोहे, राजू तेलंगोटे यांनी पिकअप टेम्पो पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. तर चालक अशोक तळेकर यास ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद