शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अजिंठ्याजवळ धावत्या बसने घेतला पेट, दैवबलवत्तर म्हणून २८ प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:14 IST

या भीषण घटनेमध्ये  कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

औरंगाबाद : पुण्यावरून मलकापूरला २८ प्रवासी घेऊन जाणाऱ्या (एमएच १२ ई. क्यू ९० ० ७) एका खासगी बसने अचानक पेट घेल्याची घटना आज पहाटे अजिंठा गावाजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडी थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. 

या भीषण घटनेमध्ये  कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पुण्यावरून एक खाजगी बस बुधवारी रात्री मलकापूरकडे रवाना झाली. आज पहाटे औरंगाबाद पार केल्यानंतर  सिल्लोड-जळगाव महामार्गावरील अजिंठा गावाजवळ बाळापूर फाटा येथे प्रवास्यांनी भरलेल्या या खाजगी बलसा अचानक आग लागली. ही बाब चालक संतोष गईच्या लक्षात आली. संतोष याने प्रसंगावधान राखत बस बाजूला उभी केली. सर्व प्रवास्यांना तत्काळ खाली उतरण्याची सूचना केली. यामुळे बसमधील सर्व २८ प्रवासी वेळीच बाहेर पडले. चालकाने प्रवाशांना सुखरूप खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला 

घटनेची माहिती मिळताच  अजिंठा पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल बामणे, कोल्हे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. बसने पेट घेण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग