शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात अल्पवयीन मुलास तिघांची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 18:15 IST

तिघांनी अचानक शिवीगाळ करत केली मारहाण

- मेहमूद शेखवाळूज महानगर (औरंगाबाद) : भावाला भेटण्यासाठी जाणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलास रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.२) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकरणी मुख्य आरोपी व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लक्षदिप चंद्रकांत गोरे (१७, रा.सिडको वाळूजमहानगर) हा बजाजनगरातील एका खाजगी शाळेत शिक्षण घेतो. गुरुवार (दि.२) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास लक्षदिप गोरे हा बजाजनगरात आपल्या भावाला भेटण्यासाठी चालला होता. शहीद भगतसिंग शाळेजवळ आदित्य बाविस्कर, त्याचा अल्पवयीन भाऊ तसेच साथीदारांनी लक्षदिप यास रस्त्यात अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लक्षदिप समजावून सांगत असताना तिघांनी त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आदित्य बाविस्करने लोखंडी पाईप, सिमेंटचा गट्टु डोक्यात मारुन लक्षदिपचे डोके फोडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या लक्षदिपने बचावासाठी आरडा-ओरडा केला. यावेळी अक्षय राठोड व इतरांनी धावून जात लक्षदिपची सुटका केली. यानंतर हल्लेखोर तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या लक्षदिप गोरे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरलबजाजनगरात लक्षदिप गोरेस मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आदित्य बाविस्कर व त्याचे दोन साथीदार हे लक्षदिप यास बेदम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे.  तसेच मध्यस्थी करणाऱ्यांना दमबाजी करीत असल्याचे कैद झाले आहे. या प्रकरणी लक्षदिप गोरे याच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारा आदित्य बाविस्कर (रा.बजाजनगर) व दोन अल्पवयीन मुलाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.विलास वैष्णव हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद