शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या त्रासाने अल्पवयीन मुलीने संपवले जीवन;आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:40 IST

गुन्हा दाखल होऊनही आरोपींच्या नातेवाइकांकडून मुलीच्या घराबाहेर येऊन धमक्या देण्याचा प्रकार सुरू आहे

छत्रपती संभाजीनगर : जटवाड्यातील ओव्हर गावात १६ वर्षीय पूजा शिवराज पवार या तरुणीने एका तरुणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. रविवारी उघडकीस आलेल्या घटनेचा ग्रामस्थांसह विविध संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी ग्रामस्थांकडून गावाच्या मुख्य रस्त्यावर तीन तास ठिय्या देत संताप व्यक्त केला. तर आज देखील हर्सूल टी पॉईंट येथे तीन तास चक्काजाम आंदोलन करून ग्रामस्थांनी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी दिली. यासाठी पोलिसांना सात दिवसांचा अल्टिमेटम देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

१८ ऑगस्ट रोजी पूजाने घरामागील विहिरीत उडी मारून आयुष्य संपवले. गावातीलच तरुण कासिम यासिन पठाण (२१) हा एकतर्फी प्रेमातून तिला छळत होता. सातत्याने कॉल, मेसेज करणे, ट्युशनपर्यंत पाठलाग करणे, भेटण्यासाठी धमकावत होता. यात त्याच्या कुटुंबियांचा देखील सहभाग होता. त्याला कंटाळून पूजाने आत्महत्या केली. यात हर्सूल पोलिसांनी आत्तापर्यंत कासिमसह राजू यासिन पठाण व जब्बार गफ्फार पठाण यांना अटक केली आहे. तर उर्वरित यासीन सुभान पठाण, गफ्फार सुभान पठाण, इरफान हारुण पठाण, हारुण सुभान पठाण हे मात्र अद्यापही पसार आहेत.

पॉक्सोचे कलम का टाळले ?पूजाच्या आत्महत्येत बाललैंगिक अत्याचाराचे कलम लावावे, स्वतंत्र तपास पथक नेमून गांभीर्याने तपास करावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ओव्हरगावच्या ग्रामस्थांनी मंगळवारी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. पूजाच्या कुटुंबियांचे अश्रू थांबत नव्हते. रविवारी आत्महत्येस जबाबदार ठरल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तेव्हा बाललैंगिक अत्याचाराचे कलम लावण्याची विनंती करूनही पोलिसांनी टाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.

आरोपींचे धमकीसत्र अद्यापही सुरूग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, पूजाच्या आत्महत्येनंतरही आरोपींच्या नातेवाइकांची घरासमोर येऊन धमक्या सुरू आहेत. आज अटक, कल बेल, असे म्हणत एक तरुण धमकी देत असल्याचा व्हिडीओ समोर आला. पोलिसांनी मात्र या व्हिडीओची पुष्टी केली नाही. यापूर्वी देखील जिन्सीतील तणावानंतर या गावात दाेन गटात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी यावेळी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद