शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बाईक आडवी लावली, कार फोडली; हवालाचे २७ लाख रुपये घेऊन जाताना व्यापाऱ्यास लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:16 IST

करोडी शिवारातील थरारक घटना; या प्रकरणी दाैलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे

औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील कापसाच्या व्यापाऱ्यास हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असताना करोडी शिवारातील टोलनाक्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

साईनाथ मनोहर तायडे (रा. लासूर स्टेशन) असे लुटलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ तायडे हे औरंगाबाद शहरातून चालक ज्ञानेश्वर भुसारे ( रा. देवळी, ता. गंगापूर) सह लासूर स्टेशनकडे चारचाकी (एमएच २० सीएस ३९१५) वाहनातून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जात होते. करोड शिवारातील टोलनाक्याच्या अगोदर असलेल्या उड्डाणपुलावरून लासूर स्टेशनकडे जाण्यासाठी कार वळवली असता समोरून अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने दुचाकी कारसमोर उभी करून अडवली. तायडे यांना आपल्या वाहनाकडून दुचाकीस्वारांना काही कट बसला की काय, असे वाटले म्हणून त्यांनी दुचाकीस्वारांची माफी मागितली. तोपर्यंत पाठीमागून आलेल्या दुसऱ्या चोरट्याने तायडे यांच्या कारची समोरील काच लाकडी दांड्याने फोडून टाकली. तसेच हातावर दांड्याने मारहाण करीत गाडीत असलेली बॅग काढून द्या, असे धमकावले. घाबरलेल्या तायडे यांनी गाडीतील रोख रक्कम असलेली २७ लाख ५० हजार रुपयांची बॅग चोरट्याच्या हातात दिली. तेव्हा ही बॅग घेऊन चोरटे उड्डाणपुलाच्या खालून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हवालाचे पैसे असल्याचा दावाकापसाचे व्यापारी तायडे यांनी शहरातील गोमटेश मार्केट परिसरातून हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे हे पैसे कोणाला देण्यासाठी घेऊन जात होते याविषयीची माहिती पोलिस चौकशीत समोर येणार आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धावघटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, वाळूज एमआयडीसीचे निरीक्षक तथा प्रभारी सहायक आयुक्त संदीप गुरमे, दौलताबादचे निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक संजय गीते, उपनिरीक्षक सचिन वायाळ, चेतन ओगले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद