शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मित्रांचे सोबतच जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू

By सुमित डोळे | Updated: July 25, 2023 12:00 IST

झाल्टा फाटा परिसरात जेवण करून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे निघालेल्या मित्रांना भरधाव वाहनाने दिली धडक

छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाटा परिसरात जेवण करून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे निघालेल्या मित्रांना सुसाट कारने उडवले. यात अभिषेक राजू लोकल (२५, रा. कडा वसाहत, गारखेडा) आणि विजय जगन्नाथ काकडे (२५, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा मित्र उमेश उमानंद कत्तीकर (२३, रा. कडा वसाहत, गारखेडा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुंदरवाडीजवळ सोमवारी पहाटे ३ वाजता हा अपघात झाला.

जखमी उमेश एका फ्रेम बनवण्याच्या दुकानात काम करतो. तर त्याचे दोन मित्र अभिषेक आणि विजय हे खासगी कंपनीत कामगार होते. रविवारी अभिषेक आणि विजय दोघांनी दिवसभर कंपनीत काम केले. त्यानंतर उमेशला संपर्क करून सोबत जेवण्यासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन ठरले. एकाच दुचाकीवरून ते झाल्टा परिसरात गेले. जेवण करून परतत असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास सुंदरवाडी परिसरात त्यांना सुसाट गाडीने धडक दिली. वेग खूप असल्याने धडकेत तिघेही दूरवर फेकले गेले. विजय व अभिषेक डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. मात्र, मध्यरात्र असल्याने त्यांना वेळेवर मदतही मिळू शकली नाही. परिणामी, दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारी गाडी बोलेरो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, तिचा क्रमांक स्पष्ट होऊ शकला नाही. हेड कॉन्स्टेबल राजधर शेजुळ अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद