शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एका गोळीने टळू शकतो गर्भवती महिला आणि बाळावरील मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:33 IST

फॉलिक ॲसिड हे शरीरात अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर : कल्पना करा, तुमच्या आयुष्याचा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे बाळाचा जन्म आणि त्याच क्षणी डॉक्टर सांगतात की, नवजात बाळाची शस्त्रक्रिया करावी लागेल. हृदयाचा ठोका चुकतो ना? पण हे टाळता आले तर? खरे सांगायचे तर, फक्त एका छोट्याशा फॉलिक ॲसिडच्या गोळीने हा मोठा त्रास टाळू शकताे. होय, हेच सत्य आहे.

फॉलिक ॲसिड हे शरीरात अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे. हे केवळ जन्मजात विसंगती टाळण्यासाठीच नव्हे, तर शरीरातील रक्तनिर्मितीसाठी आणि विशेषतः ॲनिमिया टाळण्यासाठीही उपयुक्त ठरते. कित्येक जन्मत: दोष केवळ आईने फॉलिक ॲसिड घेतले, तर टळतात. पण, ही गोळी पाळी चुकल्यावर घेऊन काहीच फायदा नाही, कारण तोपर्यंत होणाऱ्या बाळाचा डीएनए फिक्स झालेला असतो. म्हणून, गर्भधारणेपूर्वी तीन महिने फॉलिक ॲसिड सुरू करणे योग्य ठरते. नंतर पूर्ण नऊ महिने फॉलिक ॲसिड घ्यावे. यातूनच बरेच बर्थ डिफेक्टस् ८५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात किंवा आजाराचे स्वरूप सौम्य होऊ शकतो, असे तज्ज्ञ म्हणाले.

१,५६१ ॲनिमियाग्रस्त महिलांची प्रसूतीघाटीत २०२४ मध्ये ॲनिमियाग्रस्त १ हजार ५६१ महिलांची प्रसूती झाली.

१८० दिवस गोळ्यागरोदर महिलांना आरोग्य विभागाकडून गरोदरपणात १८० दिवस आणि प्रसूती झाल्यानंतर १८० दिवस फाॅलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात.

चहाला फॉलिक ॲसिडयुक्त करावेपरदेशात नवविवाहित जोडप्यांना फाॅलिक ॲसिड गिफ्ट दिले जाते. मोठ्या सामूहिक विवाहाच्या आयोजनात जर आम्हास बोलावले, तर आम्ही नवविवाहित पती, पत्नी यांना सखोल माहिती देऊ व सामाजिक जबाबदारीला मदत होईल. पिण्याच्या चहाला जर आपण फॉलिक ॲसिडयुक्त केले, तर असे वाटते की बरेच बर्थ डिफेक्ट्स नियंत्रणात आणू शकू.- डॉ. आर. जे. तोतला, वरिष्ठ, पेडियाट्रिक सर्जन व पेडियाट्रिक युरोलॉजिस्ट

महत्त्वपूर्ण गोळ्याआरोग्य विभागातर्फे गरोदर महिलांसह लहान मुले, मुलींना फाॅलिक ॲसिड आणि आयर्नच्या गोळ्यांचे वितरण केले जाते. महिलांचा रक्तक्षय कमी करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचारासाठी या गोळ्या महत्त्वाच्या आहेत.- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य