शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

दोनदा विधानसभा लढवलेला नेता अन् पोलिसांकडून दोघांचे अपहरण, बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:19 IST

राजकीय पदाधिकारी, पोलिसाकडून दोघांचे अपहरण, गंभीर मारहाण, डोक्याला पिस्तूलही लावले; पोलिस पुत्राचा गुन्ह्यात सहभाग, पीडित तरुणही सेवानिवृत्त फौजदाराचा मुलगा

छत्रपती संभाजीनगर : दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेला राजकीय पदाधिकारी संदीप भाऊसाहेब शिरसाठ याने पोलिस भावाच्या मदतीने दोन तरुणांचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. १५ ते २० गुंडांसह त्यांना बेदम मारहाण करून एकाला १५ तास ओलीस ठेवून पिस्तुलाने धमकावले. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्याआधीच गुन्हे शाखेने संदीपला सातारा पोलिस ठाण्यातूनच अटक केली.

शरद भावसिंग राठोड (३३, रा. छत्रपतीनगर, देवळाई) हे बांधकाम कंत्राटदार आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांची अभिजीत ऊर्फ बंटी बर्डे (२८) याच्यासोबत ओळख झाली. अभिजीत शासकीय कंत्राटे मिळवण्याच्या प्रक्रियेत तरबेज आहे. त्यासाठी तो शिरसाठचे काम पाहत होता. मात्र, शिरसाठच्या छळामुळे अभिजीतने त्याचे काम बंद केले. त्यातून शिरसाठ त्याला मारहाण करून धमकावत होता. अभिजीत त्याचे काम सोडून शरदचे काम करत असल्याची कुणकुण शिरसाठला लागली. शनिवारी मध्यरात्री २ वाजता शरद बीड बायपासवरील हॉटेल साईस्वराज येथे होते. शिरसाठ, शहर पाेलिस दलात कार्यरत त्याचा भाऊ मिथुन भाऊसाहेब शिरसाठ, स्वप्निल गायकवाड, हर्षल यांनी त्यांना फॉर्च्यनुरमध्ये बळजबरीने बसवून सुधाकरनगरच्या कार्यालयावर नेले.

अंगावर वळ उमटेपर्यंत मारहाणसर्व आरोपींनी मिळून शरद यांना बेल्ट, वायर, रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. कपाळावर पिस्तूल लावून बंटीला हाॅटेलवर बोलावण्याचे नाटक करण्यास सांगितले. बंटी देवळाई चौकात पोहोचताच शिरसाठच्या गुंडांनी बंटीलाही कार्यालयात नेत गंभीर मारहाण केली. शरद यांच्या घरी नेत बंटीचे सर्व साहित्य, लॅपटॉप, कपडे ताब्यात घेतले. त्यानंतर पहाटे शरद यांना देवळाई चौकात सोडले.

थेट पोलिस आयुक्तांकडे धावबंटीचा १० वाजेपर्यंत संपर्क न झाल्याने शरद यांनी थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत घटनाक्रम सांगितला. पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना कारवाईच्या सूचना केल्या. सहायक निरीक्षक रवी गच्चे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळंके, प्रवीण वाघ यांचे पथक शिरसाठच्या शोधासाठी रवाना झाले. घर, कार्यालयात तो मिळून आला नाही. तोपर्यंत शिरसाठला पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचल्याची कुणकुण लागली. त्याने रात्री ९ वाजेपर्यंत बंटीला सोबत ठेवत तक्रार न देण्यासाठी धमकावून तक्रार नसल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याला स्वत: सातारा ठाण्यात घेऊन जात तक्रार नसल्याचे लिहून देण्यासाठी दमदाटी केली.

पोलिसांनी डाव उधळून लावलाशिरसाठ प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. तो सातारा ठाण्यात पोहोचल्याचे कळताच गुन्हे शाखेने ठाण्यात धाव घेतली. बंटीला त्याच्यापासून वेगळे करत शिरसाठला अटक केली. न्यायालयाने त्याला ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शिवाय, अपहरणासाठी वापरलेल्या शिरसाठच्या दोन गाड्याही जप्त केल्या.

सर्वांना पोलिसांची पार्श्वभूमीशिरसाठ स्वत: पोलिस पुत्र असून त्याचा भाऊ मिथुन क्रांती चौक पोलिस ठाण्यात नियुक्त आहे. मात्र, दोन वर्षांपासून कर्तव्यावर गैरहजर आहे. हर्षलचे वडीलही पोलिस आहेत. राठोडचे वडील सेवानिवृत्त फौजदार आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण